तीर्थक्षेत्र बचाव समितीचा पर्यायी आराखडा; सर्वांना सोबत घेऊनच कॉरिडॉर- मुख्यमंत्री:पंढरपूर कॉरिडॉर बाबत समितीसोबत मुंबईत बैठक, समितीच्या सूचनांचा विचार करु
पंढरपूर कॉरिडॉर बाबत तीर्थक्षेत्र बचाव समितीने मांडलेल्या सर्व मुद्द्यांचा आणि पर्यायी आराखड्याचा निश्चितपणे सकारात्मक विचार केला जाईल, पंढरपूरचा विकास ५० वर्षांचाविचार करुन सर्वांना सोबत घेऊन, समन्वयाने कॉरिडॉरची अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ””पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समिती””च्या शिष्टमंडळाची…