जिममध्ये व्यायाम करतानाच तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू:कन्नड शहरातील घटना, मृत अंकुश रावते बहिरगावचे रहिवासी
जिममध्ये दैनंदिन व्यायाम करत असताना बहिरगाव (ता. कन्नड) येथील रहिवासी अंकुश कडुबा रावते (३०) या तरुणाचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे कन्नड शहर व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंकुश रावते हे नेहमीप्रमाणे गुरुवारी (२७ ऑगस्ट) सकाळी आपल्या पुतणीला शाळेत सोडल्यानंतर कन्नड शहरातील एका खाजगी जिममध्ये व्यायाम करण्यासाठी गेले होते….