Headlines

जळगाव जिल्ह्यात दोन हृदयद्रावक घटनांत 6 मृत्यू:एकाची पत्नी, 2 मुलांसह आत्महत्या; दुसऱ्याने मुलासाठी प्राण गमावला

अमळनेर तालुक्यात गुरुवारी घडलेल्या दोन गावांतील वेगळ्या घटनांनी पित्याच्या नात्याचे दोन टोकाचे पैलू समोर आणले आहेत. एका घटनेत बापाने नैराश्यातून पत्नी आणि दोन मुलांसह रेल्वेखाली उडी घेत जीवन संपवले. तर दुसऱ्या घटनेत, पाण्यात बुडणाऱ्या मुलाला वाचवण्यासाठी बापाने स्वतःचा जीव धोक्यात घातला, मात्र दुर्दैवाने त्यात दोघांचाही मृत्यू झाला. या दोन्ही घटनांमुळे अमळनेर तालुक्यात मोठी हळहळ व्यक्त…

Read More

मालेगावात 5 दिवसांच्या मुलाची आईकडून 70 हजारांमध्ये विक्री:महिलेस अटक, पाच दिवसांची कोठडी

पोटच्या ५ दिवसांचा मुलाची ७० हजार रुपयांत विक्री करणाऱ्या निर्दयी मातेला आयशानगर पोलिसांनी अटक केली. फरजाना चांद शेख असे तिचे नाव आहे. तिला गुरुवारी ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. महिलेस खोट्या कागदपत्रांद्वारे गुन्ह्यात गोवल्याचा आरोप तिच्या वकिलांनी केला आहे. फरजाना हिचा विवाह फार काळ टिकला नाही. सध्या ती एकटी राहायची. तिला जुलैमध्ये मूल झाले….

Read More

नवनाथ बन यांचा अभ्यास कच्चा:MPSC पेपरफुटीतील संशयित सुनील गाडवे भाजपचाच कार्यकर्ता, सुनील मानेंचा खळबळजनक आरोप

भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांचा अभ्यास कच्चा असून राज्यसेवा आयोगाच्या पेपरफुटी प्रकरणातील संशयित सुनील गाडवे हा भाजपचा कार्यकर्ता असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सुनील माने यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे. येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शहर कार्यालयात ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. याबाबत बोलताना सुनील माने म्हणाले,…

Read More

वादग्रस्त वक्तव्य भोवले:नितेश कराळे मास्तर यांना न्यायालयीन कोठडी, कारागृहात रवानगी

आपल्या बेधडक आणि विनोदी भाषणशैलीमुळे संपूर्ण राज्यभरात लोकप्रिय असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेश प्रवक्ते नितेश कराळे मास्तर यांना वर्धा शहर पोलिसांनी गुरुवारी पहाटे ताब्यात घेतले. त्यानंतर दिनांक २७ ऑगस्ट रोजी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यांची रवानगी आता थेट कारागृहात करण्यात आली आहे. वादग्रस्त वक्तव्य आणि विहिंपची…

Read More

CM Fadnavis Issues Directives for Ganesh Utsav 2026 & Road Maintenance

राज्याचा उत्सव म्हणून साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सव मंडळांना प्रसादाची शुद्धता आणि भाविकांच्या सुरक्षिततेबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. मंडळांनी भाविकांना शुद्ध व भेसळमुक्त प्रसाद मिळे . गणेशोत्सव-२०२६ मधील कायदा व सुव्यवस्थेच्या तयारीसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. उत्सवाचे नियोजन करताना प्रशासन, गणेशोत्सव मंडळे आणि समन्वय समित्यांनी परस्पर समन्वयाने…

Read More

नेपाळमध्ये महापूर:ठाणे जिल्ह्यातील कैलास मानसरोवर यात्रेकरू संपर्काबाहेर, 31 जण अडकले असण्याची भीती, नातेवाईक चिंतेत

नेपाळ-चीन सीमेवरील रसुवा आणि भोटेकोशी परिसरात ढगफुटीनंतर आलेल्या भीषण महापुरामुळे कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या ठाणे जिल्ह्यातील अनेक भाविकांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. ठाणे शहर, नौपाडा, समता नगर, बाळकुम, कल्याण पश्चिम, डोंबिवली तसेच नवी मुंबईतील वाशी परिसरातील काही नागरिक या यात्रेत सहभागी झाले होते. महापुरानंतर मोबाईल नेटवर्क विस्कळीत झाल्याने त्यांचा नातेवाईकांशी संपर्क तुटला आहे. २६ ऑगस्ट…

Read More

महागाई, बेरोजगारीविरोधात भाकपचा दिल्लीत मोर्चा:‘बदलाव जरुरी है’ घोषणेसाठी जिल्हाभर जनजागरण

भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) महागाई, बेरोजगारी, शेतकरी-शेतमजुरांचे प्रश्न आणि महिलांवरील अत्याचाराविरोधात आक्रमक झाला आहे. या मुद्द्यांवर लक्ष वेधण्यासाठी भाकप १ सप्टेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर भव्य मोर्चा काढणार आहे. या मोर्चातून ‘बदलाव जरुरी है’ असा नारा दिला जाईल. देशात वाढती महागाई, शेतकरी-शेतमजुरांच्या समस्या, पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांची होणारी फसवणूक, युवकांमधील बेरोजगारी, तसेच महिला व अल्पसंख्याकांवर वाढते अत्याचार…

Read More

अमरावती जिल्ह्यातील 550 ग्रामपंचायत प्रशासकांचा कार्यकाळ संपला:पुढील प्रशासकीय व्यवस्थेसाठी सीईओंचे शासनाकडे मार्गदर्शन

अमरावती जिल्ह्यातील सुमारे ५५० ग्रामपंचायतींच्या प्रशासकांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. सार्वत्रिक निवडणुकांना अद्याप वेळ असल्याने, पुढील प्रशासकीय व्यवस्थेबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी राज्य शासनाकडे मार्गदर्शन मागवले आहे. यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय आलेला नाही, त्यामुळे ग्रामपंचायतींचा कारभार कोण पाहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील या साडेपाचशे ग्रामपंचायतींचा कार्यकाळ सहा महिन्यांपूर्वीच…

Read More

मेंढी चराई निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी अमरावतीत मेंढपाळांचे आंदोलन:जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या; 24 ऑगस्टच्या शासन निर्णयाची मागणी

मेंढी चराईच्या शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी जिल्ह्यातील मेंढपाळांनी आज, गुरुवार, २७ ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. राज्याच्या वन विभागाने २४ ऑगस्ट रोजी यासंदर्भात शासन निर्णय (जीआर) जारी केला होता. या जीआरनुसार प्रत्येक जिल्हा पातळीवर आवश्यक कार्यवाही अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे संबंधित पत्रव्यवहार त्वरित पूर्ण करून या निर्णयाची अंमलबजावणी…

Read More

'बदलाव जरुरी है' अभियान: नांदगाव तालुक्यात 12 गावांत सभा:1 सप्टेंबरला दिल्लीत आंदोलनासाठी कार्यकर्त्यांची हाक

भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकप) ‘बदलाव जरुरी है’ या देशव्यापी जनजागरण अभियानांतर्गत नांदगाव तालुक्यात १२ गावांमध्ये सभा घेतल्या. पक्षाचे राष्ट्रीय कौन्सिल सदस्य कॉम्रेड तुकाराम भस्मे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते १ सप्टेंबर रोजी दिल्लीत होणाऱ्या आंदोलनासाठी शेतकरी, कामगार, युवक आणि असंघटित क्षेत्रातील लोकांना एकत्र करत आहेत. या अभियानाची सुरुवात ९ ऑगस्ट रोजी क्रांतिदिनी मंगरूळ चव्हाळा येथे रॅली आणि…

Read More