Headlines

300 वर्षांची परंपरा:शिरसाळा मारुतीच्या दर्शनाला मोठी गर्दी‎, मंदिर परिसर भाविकांच्या आकर्षणाचे सर्वात मोठे केंद्र‎

प्रतिनिधी | खामगाव बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथील श्री सिद्धेश्वर हनुमान मंदिर अर्थात शिरसाळा मारुती मंदिर हे परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून प्रसिद्ध आहे. सुमारे ३०० वर्षांची परंपरा असलेल्या या जागृत देवस्थानाकडे आता खामगावसह बुलडाणा जिल्ह्यातील भाविकांचाही मोठ्या प्रमाणात ओढा वाढताना दिसून येत आहे. विशेषतः प्रत्येक शनिवारी खामगाव शहर व परिसरातून अनेक भाविक शिरसाळा मारुतीच्या दर्शनासाठी येत…

Read More

औद्योगिक परिसरात स्वतंत्र उपकेंद्र प्रस्तावित:महावितरण अन् औद्योगिक ग्राहकात संवाद बैठकीत तक्रारींचा पाऊस‎

महावितरण कंपनी आणि उद्योजकांमध्ये (औद्योगिक ग्राहक) संवाद बैठक पार पडली. औद्योगिक ग्राहकांना अखंडित आणि दर्जेदार वीज पुरवठा देण्यासाठी महावितरण कटिबद्ध आहे. त्यासाठी औद्योगिक वाहिन्यांची देखभाल-दुरुस्ती नियमित करण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच औद्योगिक ग्राहकांची नवीन वीज जोडणी असेल, किंवा सरासरी व वाढीव वीजबिलासंबंधी तक्रारी असतील, तर त्या प्राधान्याने सोडवण्यात येतील, अशी ग्वाही मुख्य अभियंता दत्तात्रय…

Read More

तरुणाचा विहिरीत आढळला मृतदेह:मोर्शी ठाण्यावर धडकले डोंगर यावलीचे ग्रामस्थ

मोर्शी मोर्शीपासून जवळच असलेल्या डोंगर यावली येथील शेत शिवारातील एका विहिरीत ३३ वर्षीय युवकाचा मृतदेह शुक्रवारी (दि. २१) रात्री आढळला. सुरज अशोकराव चढोकर असे मृत युवकाचे नाव आहे. या घटनेनंतर डोंगर यावली येथील मृतकाच्या कुटुंबीयांसह सुमारे २५० ते ३०० महिला व ग्रामस्थांनी शनिवारी (दि. २२) मोर्शी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. पोलिसांच्या जुगारावरील कारवाईदरम्यान भीतीपोटी पळत…

Read More

पावसाच्या दीर्घ खंडाचा पिकांना फटका; दुष्काळ जाहीर करावा:क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन‎

पावसाच्या दीर्घ खंडाचा फटका पिकांना बसला आहे. जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी करीत क्रांतिकारी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. शेतकऱ्यांना तातडीने भरीव मदत देण्याच्या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना सादर करण् . यंदा उन्हामुळे प्रचंड त्रस्त झालेल्या अकोलेकरांना धो-धो पाऊस बरसेल, अशी अपेक्षा होती. मात्र जून महिन्याच्या प्रारंभी फारसा पाऊस झाला नाही. २३…

Read More

आधुनिक भारताच्या उभारणीत राजीव गांधींचे योगदान- देशमुख:माजी पंतप्रधान राजीव गांधींना जयंतीनिमित्त अभिवादन‎

भारताचे माजी पंतप्रधान तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त येथील काँग्रेस भवनात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या हस्ते दिवंगत राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. या वेळी बोलताना बबलू देशमुख म्हणाले की, दिवंगत राजीव गांधी यांनी देशाच्या विकासाला आधुनिक तंत्रज्ञानाची…

Read More

आमदारांनी जाणून घेतल्या अडचणी:आमदार पाटील यांनी केला आलेगाव येथे मुक्काम‎

शेतकऱ्यांचे शेतीविषयक प्रश्न, वीजपुरवठ्याच्या अडचणी, शेतजमिनीच्या बांधांचे वाद, रस्ते, रेशन धान्य, पाणीपुरवठा, गावातील मूलभूत सुविधा, शाळा, घरकुल, आरोग्य सेवा व विविध शासकीय दाखले यांसह नागरिकांच्या अनेक प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. ‘आमदार मुक्कामी, आपल्या गावी’ या नावीन्यपूर्ण अभियानाचा प्रारंभ माढा तालुक्यातील आलेगाव खुर्द या गावातून झाला. आमदारांसह प्रशासनही गावात आल्याने या उपक्रमाला ग्रामस्थांनी प्रतिसाद देत आपल्या…

Read More

केमच्या कुंकात रासायनिक घटक; समितीने बैठकीत व्यक्त केली चिंता:विधिमंडळ अंदाज समितीच्या आढावा बैठकीमध्ये केली पोलखोल‎

विधिमंडळ अंदाज समितीच्या पाच आमदारांच्या पथकाने पंढरपूर शहराला भेट देऊन विकासकामांची पाहणी केली. मात्र, या संपूर्ण दौऱ्यात समितीने शहरातील केवळ एकाच रस्त्याची पाहणी करून विठ्ठल दर्शन घेत पुढच्या तालुक्यात प्रयाण केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. . सोलापूर केमचे प्रसिद्ध असलेल्या कुंकवामध्ये रासायनिक घटक आहेत. त्याचा महिलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, अशी पोलखोल शनिवारी विधिमंडळाच्या…

Read More

वैज्ञानिक दृष्टिकोनामधूनच सक्षम भारताची निर्मिती शक्य:डमरे यांचे प्रतिपादन; सुलाखे कॉलेजमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन दिन उत्साहात‎

सामाजिक ऐक्य, परस्पर सन्मान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हीच सक्षम राष्ट्राची खरी ताकद असून विद्यार्थ्यांनी चिकित्सक विचारसरणी विकसित करून विवेकाच्या आधारावर निर्णय घेण्याची सवय अंगीकारावी, असे प्रतिपादन प्रमुख पाहुण्या जे. पी. डमरे यांनी केले. . बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने सद्भावना दिवस व राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन उत्साहात…

Read More

लँडिंग करताना इंडिगो विमानाची शेपटी धावपट्टीवर आदळली:178 प्रवासी होते, पायलटने दुसऱ्या प्रयत्नात उतरवले; गोरखपूरची घटना

गोरखपूर विमानतळावर एक विमान दुर्घटना टळली. इंडिगोच्या विमानाची लँडिंग होत असताना त्याचा मागील भाग (शेपटी) जमिनीला धडकला होता. यानंतर वैमानिकाने विमान पुन्हा हवेत उडवले. काही वेळाने एअर ट्रॅफिक कंट्रोलची (ATC) मंजुरी मिळाल्यानंतर विमानाची पुन्हा लँडिंग करण्यात आली. ही घटना 19 ऑगस्ट रोजी घडली. पण ती आज समोर आली. दिल्लीहून येणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइट 6E 2381 मध्ये…

Read More

सलग सुट्यांमुळे वटवृक्ष मंदिरात स्वामी दर्शनासाठी भाविकांची गर्दी:अन्नछत्र मंडळात घेतला महाप्रसाद;‎ तासाभरात सहा हजार भाविकांचे दर्शन‎

अक्कलकोट श्रावण मास सुरुवात होऊन सलग शनिवार रविवार, सलग सुट्यामुळे शनिवारी पहाटेपासून वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात गर्दी झाली होती. दिवसभरात सुमारे ५० हजारपेक्षा जास्त भाविकांनी स्वामींचे दर्शन घेतले. शनिवारी पहाटे पाच वाजल्यापासूनच मुक्कामी असलेल्य . सेल्फीची क्रेझ वटवृक्ष मंदिरातील ऐतिसाहिक वटवृक्ष, रुद्राक्ष स्वामी चित्र, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ प्रांगणातील अजानबाहू स्वामीची मूर्ती, स्वामी वाटिका,…

Read More