Headlines

शिवन्यात जलजीवन मिशनचे काम रखडले:चार कोटींहून अधिक खर्च करूनही काम 40 टक्केच पूर्ण झाले

शिवन्यासह सहा गावांतील सुमारे ५० हजार नागरिकांची तहान भागवणारा अजिंठा-अंधारी मध्यम प्रकल्प मृतसाठ्यात पोहोचला आहे. त्यातच तब्बल चार कोटींहून अधिक खर्च होऊनही जलजीवन मिशनचे काम अपूर्ण असल्याने आगामी सात महिने पाणीपुरवठा कसा करायचा, असा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिला आहे. दिवाळीनंतर पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता असून, नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागण्याची भीती व्यक्त होत आहे….

Read Full News

खरेदी-विक्री संघाच्या संचालकपदी शिवसेनेचे संकेत राठोड यांची निवड:सोयगाव येथे आयोजित बैठकीला 16 पैकी 15 संचालकांची उपस्थिती

सोयगाव तालुका खरेदी-विक्री संघाच्या संचालकपदासाठी बुधवारी पार पडलेल्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे संकेत राठोड यांची बिनविरोध निवड झाली आहे. अध्यासी अधिकारी विजय लखवाल यांनी दुपारी दीड वाजता या निवडीची अधिकृत घोषणा केली. दिवंगत संचालक राजेंद्र राठोड यांच्या निधनामुळे हे संचालकपद रिक्त झाले होते. अध्यासी अधिकारी विजय लखवाल यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेला…

Read Full News

दिवाळीसाठी 25 हजार लक्ष्मीमूर्तींचे काम अंतिम टप्प्यावर; यंदा भाव स्थिर:4 इंचांपासून 1 फुटापर्यंतच्या कमळावर विराजमान लक्ष्मी

दिवाळीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. शहरातील मूर्तिकारांच्या कारखान्यात लक्ष्मीमूर्ती घडवण्याची लगबग सुरू आहे. शहरात २५ हजार लक्ष्मीमूर्ती तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यंदाचे दर मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत जैसे थे राहतील, असे मूर्तिकारांनी सांगितले. दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व आहे. घरोघरी लक्ष्मीची मूर्ती प्रतिष्ठापित करून पूजा केली जाते. त्यामुळे दिवाळीपूर्वीच मूर्तींची मागणी वाढते….

Read Full News

जिल्हाभरात ऑक्टोबरमध्येच जलसंकट:112 प्रकल्पांत केवळ 29 टक्के साठा, पाणी पिण्यासाठी राखीव, गतवर्षी 93.79% जलसाठा

ऑक्टोबरही संपला नाही, तोच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट घोंगावू लागले आहे. जिल्ह्यातील ११२ मध्यम व लघु प्रकल्पांचा उपयुक्त जलसाठा अवघ्या २९.५७ टक्क्यांवर आल्याने पाणी वाचवण्यासाठी प्रशासनाने अवैध उपशाविरोधात कारवाई सुरू केली. गतवर्षी . जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार ३७३.०१२ दलघमी क्षमतेपैकी केवळ ११०.३०९ दलघमी पाणी उपलब्ध आहे. वैजापूरच्या ढेकू प्रकल्पात १३ टक्के, गंगापूरच्या टेंभापुरीत २०, फुलंब्रीच्या…

Read Full News

भांबरवाडीत वृद्धाने बिबट्याला तोंडात काठी घालून पळवले:जखमी गणपत जाधव यांच्यावर कन्नडच्या रुग्णालयात उपचार सुरू; 18 तास उलटूनही वन विभाग फिरकेना

. भांबरवाडी येथील उपळा शिवारातील गट क्रमांक ५० मध्ये महामार्गालगतच्या शेतातील झोपडीत झोपलेल्या ६५ वर्षीय शेतकऱ्यावर बुधवारी मध्यरात्री २ वाजता बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. शेतकऱ्याने प्रतिकार करत बिबट्याच्या तोंडात काठी घालून आरडाओरडा केल्याने बिबट्या पसार झाला. अंगावर गोधडी असल्याने शेतकऱ्याचा जीव वाचला असून उजवा हात उघडा असल्याने त्यावर बिबट्याने पायांच्या नखांनी जखमा केल्या. कन्नड-चाळीसगाव…

Read Full News

तीव्र तापामुळे पाचोडला 13 वर्षीय मुलीचा मृत्यू घाटीत उपचार सुरू असताना प्राणज्योत मालवली

येथील १३ वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीचा तीव्र तापामुळे संभाजीनगर येथील शासकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. बुशरा मोसीन बागवान (१३) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. पाचोडच्या इस्लामपुरा येथील खासगी वाहनचालक मोसीन हमीद बागवान यांची मुलगी बुशरा ही पाचोड येथील शिवछत्रपती विद्यालयात आठवीत शिकत होती. बुशराला चार ते पाच दिवसांपासून अचानक तीव्र…

Read Full News

सिल्लोडमधील वॉटरग्रीडच्या कामांना गती देण्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश:मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत पार पडली बैठक

सिल्लोड तालुक्यात दुष्काळाची भीषणता लक्षात घेता भविष्यात भेडसावणारी संभाव्य पाणीटंचाई दूर करण्यासाठी तालुक्यातील बहुचर्चित वॉटरग्रीड योजनेची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करून ही योजना लवकरात लवकर कार्यान्वित करा, असे स्पष्ट आणि कडक निर्देश राज्याचे पा . मुंबई येथील मंत्रालयात बुधवार (२८ ऑक्टोबर) रोजी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि सिल्लोड–सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार…

Read Full News

खेर्डा प्रकल्प कोरडाठाक पडल्याने 55 गावांमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर:जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी

पैठण तालुक्यातील दुष्काळी भागाला ब्रह्मगव्हाण उपसा जलसिंचन योजनेमुळे मोठा दिलासा मिळत असला, तरी पावसातील प्रदीर्घ खंड आणि पाण्याच्या वाढत्या गरजेमुळे या भागातील शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा सिंचनाचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. सध्या शेतातील पिके वाचविण्यासाठी आणि जमिनीतील उपलब्ध ओलावा टिकवून ठेवण्यासाठी जायकवाडी धरणातून सिंचनासाठी ब्रह्मगव्हाण योजनेच्या माध्यमातून खेर्डा प्रकल्पात तातडीने पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी…

Read Full News

पुलाचे काम सुरू असल्याने रस्ता अरुंद, प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी, पुलाचे काम सुरू असल्याने रस्ता अरुंद, प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी

येथील रेल्वे गेटवरील वाहतुकीची कोंडी दिवसेंदिवस गंभीर होत असून, यामुळे वाहनधारक, व्यापारी, शेतकरी आणि प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सध्या येथे रेल्वे दुहेरीकरणासह उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने रस्ते अरुंद झाले आहेत. या उड्डाणपुलाचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी आठ ते दहा महिने लागण्याची शक्यता असल्याने तोपर्यंत ही वाहतूक कोंडी कायम राहण्याची भीती व्यक्त होत आहे….

Read Full News

आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या मयतालाही जाऊ नये- आ. गायकवाड:शिंदेसेनेच्या आमदाराचे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य, चित्रफीत व्हायरल

वादग्रस्त वक्तव्य करणारे शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मदतीचे आवाहन करतानाच आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या अंत्यसंस्कारालाही कोणी जाऊ नये, अशी भाषा वापरल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. या वक्तव्याची चित्रफीत प्रसारित झाली. दरम्यान, दिव्य मराठी या चित्रफितीची पुष्टी करत नाही. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या ‘मयतालाही कोणी जाऊ नये,’ असे सांगतानाच मृतदेहाची जनावरांकडून विटंबना झाल्यानंतर…

Read Full News