Headlines

दुष्काळात कर्जवसुली थांबवावी- आ. चव्हाण:सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांना निवेदन

दुष्काळी परिस्थितीमुळे तीव्र आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी, महिला बचत गट आणि दिव्यांग बांधवांना सक्तीच्या कर्जवसुलीपासून तात्काळ दिलासा मिळावा, या प्रमुख मागणीसाठी फुलंब्री विधानसभेच्या आमदार अनुराधा चव्हाण यांनी मुंबई येथील मंत्रालयात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. या निवेदनात आमदार अनुराधा चव्हाण यांनी ग्रामीण भागातील गंभीर वास्तव मांडले. सध्याच्या भीषण दुष्काळामुळे शेतकरी आणि…

Read Full News

उत्पादन वाढल्याने झेंडूला मिळतोय अवघा 10 ते 15रुपये किलो भाव:भरघोस उत्पादनानंतरही अपेक्षित दर नसल्याने काढणी-मजुरीचा खर्चही निघेना

दिवाळीच्या तोंडावर झेंडूच्या दरात मोठी घसरण झाल्याने जायखेडासह बागलाण तालुक्यातील उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. कमी पाण्याचे पीक आणि एकरी सुमारे ३ टन झेंडूचे उत्पादन होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्याप्रमाणात झेंडूची लागवड केली आहे. उत्पादन वाढल् . एका टन मालाच्या वाहतुकीसाठी ६ हजार रुपये खर्च येत असून, फुलांची काढणी करण्यासाठीही ४० मजुरांची गरज भासते. त्यामुळे कमी…

Read Full News

10 दिवसांत निफाडचे किमान तापमान 8 अंशांनी घसरले:दिवसा प्रचंड उकाडा, रात्री गारवा तर पहाटे थंडी, निफाड तालुक्याचे तापमान 12.7 अंश सेल्सिअस

. निफाड तालुक्यात थंडीची चाहूल लागली आहे. यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने दुष्काळी परिस्थिती आहे, अशा परिस्थितीत दिवसा कडाक्याचे ऊन, रात्री गारवा आणि पहाटे गुलाबी थंडी, असे वातावरण सध्या निफाड तालुक्यात पाहायला मिळत आहे. बुधवारी पहाटे निफाड तालुक्याचे तापमान १२.७ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. दहा दिवसांपूर्वी हेच तापमान २० अंश सेल्सिअस होते. निफाडकारांना पारा घसरल्याने…

Read Full News

नका करू असा विकास, जुनीच गटार बरी; जायखेड्यात कामावर संताप:भूमिगत गटारीचा उतार आणि चेंबरवर नागरिकांनी घेतला आक्षेप

येथील प्रभाग क्रमांक ५ मध्ये १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून सुरू झालेल्या भुयारी गटारकामाच्या तांत्रिक नियोजनावरून वाद निर्माण झाला आहे. पाईपची खोली, सांडपाण्याचा उतार आणि चेंबरच्या जागेबाबत नागरिकांनी आक्षेप घेत कामाच्या फेरतपासणीची मागणी केली आहे. हे काम अंदाजे ८ ते १० लाख रुपयांचे आहे. कामाच्या गुणवत्तेबाबत प्रशासनाने योग्य त्या तांत्रिक सूचना दिल्याचे स्पष्ट केले आहे….

Read Full News

वृक्षतोड रोखा अन्यथा जनआंदोलन; राष्ट्रवादीसह पर्यावरणप्रेमींचा एल्गार:बागलाण तहसील कार्यालयात अर्धा तास ठिय्या, तहसीलदारांना निवेदन

विकासाच्या नावाखाली बागलाणसह भीमाशंकर, कर्जत आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये सुरू असलेल्या वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पर्यावरणप्रेमींनी आक्रमक भूमिका घेतली आहे. वृक्षतोड तातडीने थांबवून संबंधित परवानग्यांची चौकशी करावी, अन्यथा . एल निनोच्या प्रभावामुळे दुष्काळाची तीव्रता वाढण्याची शक्यता असताना विविध विकासप्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर जंगलतोड होत असून देशातील ४४ प्रकल्पांपैकी २८ प्रकल्प महाराष्ट्रातील असल्याचा दावा करण्यात आला या…

Read Full News

शिरूर अनंतपाळमध्ये फायनान्स कंपन्यांची सक्तीची वसुली थांबवा:येवल्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रांताधिकारी गाढवे यांना निवेदन

यंदाच्या अपुऱ्या पावसामुळे शिरूर अनंतपाळ तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अशा बिकट परिस्थितीतही खासगी बँका आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून सक्तीची कर्जवसुली सुरू . हाताला काम नसल्याने अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे. तरीही फायनान्स कंपन्यांचे प्रतिनिधी महिला बचत गटांच्या सदस्यांवर व नागरिकांवर कर्जाचे…

Read Full News

आशा सेविकांना 10 हजार रुपये दिवाळी बोनस द्यावा:आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियनची मागणी

नगरपरिषद क्षेत्रातील आशा सेविकांना दिवाळीनिमित्त १० हजार रुपये सानुग्रह अनुदान (बोनस) मंजूर करावे, अशी मागणी आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियनने निवेदनाद्वारे केली आहे. मनमाड नगरपरिषद क्षेत्रातील सुमारे १.५० लाख नागरिकांना आशा सेविका आरोग्यविषयक सेवा पुरवतात. त्यांच्या कामाची दखल घेऊन बोनस देण्याची मागणी युनियनने केली आहे. मनमाड नगरपरिषद क्षेत्रात आशा सेविका आरोग्य विभागाच्या माध्यमातून अनेक कामे…

Read Full News

शिवन्यात जलजीवन मिशनचे काम रखडले:चार कोटींहून अधिक खर्च करूनही काम 40 टक्केच पूर्ण झाले

शिवन्यासह सहा गावांतील सुमारे ५० हजार नागरिकांची तहान भागवणारा अजिंठा-अंधारी मध्यम प्रकल्प मृतसाठ्यात पोहोचला आहे. त्यातच तब्बल चार कोटींहून अधिक खर्च होऊनही जलजीवन मिशनचे काम अपूर्ण असल्याने आगामी सात महिने पाणीपुरवठा कसा करायचा, असा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिला आहे. दिवाळीनंतर पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता असून, नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागण्याची भीती व्यक्त होत आहे….

Read Full News

खरेदी-विक्री संघाच्या संचालकपदी शिवसेनेचे संकेत राठोड यांची निवड:सोयगाव येथे आयोजित बैठकीला 16 पैकी 15 संचालकांची उपस्थिती

सोयगाव तालुका खरेदी-विक्री संघाच्या संचालकपदासाठी बुधवारी पार पडलेल्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे संकेत राठोड यांची बिनविरोध निवड झाली आहे. अध्यासी अधिकारी विजय लखवाल यांनी दुपारी दीड वाजता या निवडीची अधिकृत घोषणा केली. दिवंगत संचालक राजेंद्र राठोड यांच्या निधनामुळे हे संचालकपद रिक्त झाले होते. अध्यासी अधिकारी विजय लखवाल यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेला…

Read Full News

दिवाळीसाठी 25 हजार लक्ष्मीमूर्तींचे काम अंतिम टप्प्यावर; यंदा भाव स्थिर:4 इंचांपासून 1 फुटापर्यंतच्या कमळावर विराजमान लक्ष्मी

दिवाळीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. शहरातील मूर्तिकारांच्या कारखान्यात लक्ष्मीमूर्ती घडवण्याची लगबग सुरू आहे. शहरात २५ हजार लक्ष्मीमूर्ती तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यंदाचे दर मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत जैसे थे राहतील, असे मूर्तिकारांनी सांगितले. दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व आहे. घरोघरी लक्ष्मीची मूर्ती प्रतिष्ठापित करून पूजा केली जाते. त्यामुळे दिवाळीपूर्वीच मूर्तींची मागणी वाढते….

Read Full News