Headlines

महिला ग्राम महसूल अधिकाऱ्यास 500 रुपयांची लाच घेताना अटक:विंधन विहीरीची सातबारावर नोंद घेण्यासाठी घेतली रक्कम, आखाडा बाळापूर येथील घटना

कळमनुरी तालुक्यातील फुटाणा शिवारातील शेतातील विंधन विहीरीची सातबारावर नोंद घेण्यासाठी पाचशे रुपयांची लाच घेतांना महिला ग्राम महसूल अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बुधवारी ता. १९ दुपारी आखाडा बाळापूर येथे रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील चुंचा…

Read More

'डोहाच्या काठाशी' रसिक दंग:संभाजीनगरमध्ये 'वाचक व्यासपीठ' बैठकीत श्रीकांत उमरीकर, सोहम पिंगळीकर यांचे सादरीकरण रंगले

दिवंगत लेखक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्या डोह पुस्तकावर आधारित ‘डोहाच्या काठाशी’ हा वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम सोमवारी, सादर झाला. जीवन विकास ग्रंथालय, टिळक नगर, छत्रपती संभाजीनगरच्या वतीने ‘वाचक व्यासपीठ’ बैठकीचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. हा उपक्रम दर सोमवारी सायंकाळी होणार आहे. या व्यासपीठाच्या दुसर्‍या बैठकीत हा कार्यक्रम झाला. श्रीकांत उमरीकर आणि सोहम पिंगळीकर यांनी कुलकर्णी यांच्या…

Read More

साहित्यिकांची सामाजिक बांधिलकी:बुक क्लब सदस्यांच्या पुढाकारातून दिवंगत डॉ. संपदा मुंडे यांच्या कौटुंबिक कर्जाची परतफेड

‘साहित्यिक हा समाजाचा आरसा असतो आणि त्याचे समाजाप्रती काही दायित्व असते’, हे केवळ बोलून न दाखवता कृतीतून सिद्ध करत प्रसिद्ध पानिपतकार विश्वास पाटील, साहित्यिक राजीव श्रीखंडे आणि त्यांच्या लेखक मित्रांनी समाजात एक नवा आदर्श घालून दिला आहे. काही महिन्यांपूर्वी फलटण येथे संशयास्पद मृत्यू झालेल्या दिवंगत डॉ. संपदा मुंडे यांच्या वडिलांनी मुलीच्या शिक्षणासाठी घेतलेल्या बँकेच्या संपूर्ण…

Read More

पिंपळवंडी अत्याचार व हत्या प्रकरण:खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे विनंती करणार – सुनेत्रा पवार

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे साडेनऊ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत. त्यांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून तपासाचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्री पवार यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त…

Read More

राहुल गांधींच्या पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ला अखेर पोलिसांची परवानगी:30 कठोर अटी, ड्रोनपासून ‘डी-झोन’ बॅरिकेडिंगपर्यंत नियम

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या 22 ऑगस्ट रोजी पुण्यात होणाऱ्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाला अखेर पुणे पोलिसांनी परवानगी दिली आहे. मात्र, ही परवानगी तब्बल 30 अटी आणि शर्तींसह देण्यात आली आहे. पुण्यातील एस.एस.पी.एम. मैदानावर होणाऱ्या या कार्यक्रमासाठी सुरक्षा, गर्दी नियंत्रण, वाहतूक, अग्निसुरक्षा, ध्वनीप्रदूषण आणि महिला सुरक्षेबाबत पोलिसांनी आयोजकांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. विशेष म्हणजे,…

Read More

Green Building Congress 2026 Mumbai

भारतात वेगाने होत असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकासाला शाश्वत आणि पर्यावरणपूरक दिशा देण्यासाठी आगामी 26 ते 28 नोव्हेंबर 2026 दरम्यान मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे 24 व्या ‘ग्रीन बिल्डिंग काँग्रेस’ (GBC) चे आयोजन करण्यात आले आहे. ‘कॉन्फे . या वर्षीच्या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना “Forging a Sustainable Future – Do Good, Feel Good. Building Greener Worlds…

Read More

सिंहगडावर पर्यटकांना मारहाण प्रकरण:8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल; एका कुटुंबाला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई

सिंहगड किल्ल्यावर पर्यटनासाठी आलेल्या एका कुटुंबाला मारहाण केल्याप्रकरणी हवेली पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संकेत संजय पाटील याच्यासह सात जणांचा आरोपींमध्ये समावेश असून, त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अवधूत पांडुरंग पाटील (वय ३९, रा. व्यंकटेश सेरेनिटी, डीएसके रोड, धायरी, पुणे) हे १६…

Read More

गणेश नाईकांचा ठाण्यातील प्रकल्पावर निशाणा:म्हणाले- डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनीही सांगितलं; पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध

ठाणे आणि नवी मुंबईतील विकासाच्या मुद्द्यांवरून महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. कथित टीडीआर प्रकरणावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच, आता ठाण्यातील प्रस्तावित डेटा सेंटरच्या मुद्द्यावरून नाईक यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. डेटा सेंटरची गरज आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशात अशा केंद्रांना प्रोत्साहन देण्याचे…

Read More

हिंगोली नगरपरिषदेकडून श्रमदानातून स्वच्छता मोहीम:अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा सहभाग

हिंगोली शहरात पालिका प्रशासनाकडून बुधवारी ता. १९ सकाळी श्रमदानातून स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. औंढा रोड भागात अवघ्या दोन तासात परिसर स्वच्छ करण्यात आला. नागरीकांनीही या अभियानात सहभागी होऊन आपापल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवावा असे आवाहन करण्यात आले आहे. हिंगोली पालिकेच्या वतीने शहर स्वच्छ व सुंदर शहराची संकल्पना राबविण्यात येत आहेत. त्यानुसार सर्व प्रभागातील कचरा घंटागाडीच्या…

Read More

मराठी न येणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांवर उद्यापासून कारवाई:परिवहन मंत्री म्हणाले- आधी नोटीस देणार, 3 महिन्यांत शिकले नाहीत तर परवाना निलंबित

मराठी भाषा न जाणणारे चालक आता महाराष्ट्रात ऑटो-टॅक्सी चालवू शकणार नाहीत. ही घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. ते म्हणाले – 20 ऑगस्टपासून मोहीम सुरू होईल. मंत्री सरनाईक म्हणाले – आधी नोटीस देऊन चालकांना 3 महिन्यांत मराठी शिकण्याची संधी दिली जाईल. त्यानंतरही मराठी न शिकल्यास त्यांचा परवाना निलंबित केला जाईल. ही मोहीम संपूर्ण राज्यात…

Read More