Headlines

‘बघा बघा, मी CCTV मध्ये दिसतोय…’:चिमुरडीवर अत्याचार करून गावकऱ्यांसोबतच शोध घेत बसला, एका वाक्याने नराधमाचे फुटले बिंग

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे एका निष्पाप चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. हे पाशवी कृत्य केल्यानंतर आरोपी गावकऱ्यांमध्ये मिसळून मुलीला शोधण्याचे नाटक करत होता. मात्र, सीसीटीव्ही (CCTV) फुटेज पाहताना त्याने मारलेली ‘बघा बघा, मी सीसीटीव्हीत दिसतोय’ ही अतिशहाणपणाची बढाईच त्याच्या अंगलट आली आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे…

Read More

इंडिगोच्या वेबसाइट-अ‍ॅपवर तिकीट बुकिंगमध्ये अडचण:विमानाचे भाडे आणि वेळापत्रक दिसत नाही, वेब चेक-इनमध्ये अडचण

देशातील सर्वात मोठी एअरलाइन इंडिगोच्या ऑनलाइन तिकीट बुकिंगमध्ये अडचण येत आहे. एअरलाइनच्या वेबसाइटवर फ्लाइट शोधण्याचा किंवा नवीन बुकिंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशांना वेळापत्रक आणि भाडे दिसत नाहीये. एअरलाइनने सांगितले- सिस्टीममध्ये अधूनमधून समस्या येत आहे. यामुळे काही ग्राहकांना आमच्या ऑनलाइन सेवा वापरण्यात अडचण येऊ शकते. आमच्या टीम्स ही समस्या लवकरात लवकर ठीक करण्यासाठी काम करत आहेत….

Read More

अमेरिकेचे राजदूत म्हणाले- जम्मू-काश्मीर भारताचा महत्त्वाचा भाग:कलम 370 हटवल्यानंतर अमेरिकेच्या राजदुतांचा पहिला दौरा, मुख्यमंत्री उमर यांची भेट घेतली

भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी बुधवारी सांगितले की, जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे. ते म्हणाले, ‘मी पहिल्यांदाच या ठिकाणाला भेट देत आहे. हे एक सुंदर ठिकाण आहे.’ यासोबतच गोर यांनी काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्थेचे कौतुक केले. ते म्हणाले की, नवी दिल्ली आणि स्थानिक सरकारने यासाठी खूप काम केले आहे. अमेरिकेकडून जारी होणाऱ्या प्रवास सल्ल्यामध्ये (ट्रॅव्हल…

Read More

Arvind Sawant On Shiv Sena Symbol Case

शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हावरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईला आता आणखी महत्त्व प्राप्त झाले आहे. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवादाच्या अखेरीस महत्त्वाची मागणी मांडल . या युक्तिवादानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधत सिब्बल यांच्या भूमिकेचे समर्थन केले. ‘धनुष्यबाण…

Read More

लोहेगावमधील 'हॉटेल चूल मटण'चा परवाना निलंबित:तुकाराम मुंढेंचा दणका, स्वच्छता नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी FDA ची कारवाई

सध्या सर्वत्र तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईची चर्चा असून, अन्न भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करत त्यांचे परवाने थेट निलंबित केले जात आहेत. याच मोहिमेचा भाग म्हणून, अन्नपदार्थांची सुरक्षितता आणि स्वच्छता नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने लोहेगाव येथील ‘हॉटेल चूल मटण’वर नुकतीच कारवाई करत त्यांचा परवाना तात्काळ निलंबित केला आहे. तसेच, जोपर्यंत आवश्यक त्या…

Read More

केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या रेल्वे प्रशासनाला ठोस सूचना:पुणे विभागातील विकासकामे, सुरक्षा आणि अतिक्रमणांवर भर

केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील विविध प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले आहे. मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रातील खासदारांच्या बैठकीत त्यांनी रेल्वे प्रशासनाला विकासकामांना गती देण्यासोबतच प्रवाशांची सुरक्षितता, मूलभूत सुविधा आणि रेल्वेच्या मालमत्तेचे संरक्षण यावर ठोस सूचना केल्या. मोहोळ यांनी पुणे रेल्वे स्थानकाच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन महत्त्वाचे निर्देश दिले. प्रस्तावित अतिरिक्त…

Read More

डीएसकेकडून 11 हजार गुंतवणूकदारांची 610 कोटींची फसवणूक:पोलिसांनी उच्च न्यायालयात सादर केली माहिती

पुणे पोलिसांनी उच्च न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांच्या विविध कंपन्यांनी आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून गुंतवणूक योजनांद्वारे 11 हजारांहून अधिक नागरिकांची सुमारे 610 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. सुरुवातीला नागरिकांच्या तक्रारींमध्ये फसवणुकीची रक्कम 1300 कोटी रुपये असल्याचे समोर आले होते, परंतु बँक रेकॉर्ड आणि आर्थिक व्यवहार तपासल्यानंतर ही प्रत्यक्ष रक्कम निश्चित करण्यात आली….

Read More

शासकीय नोकरीच्या आमिषाने महिलेची 24 लाखांची फसवणूक:पर्वती पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला

पुण्यात शासकीय नोकरीचे आमिष दाखवून एका महिलेची 24 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी पर्वती पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सूर्यकांत विठ्ठल सपकाळ (वय 46, रा. तळेगाव दाभाडे) आणि योगेश अदिकराव पाटील (वय 42, रा. कोल्हापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पर्वती पोलीस ठाण्यात एका 45 वर्षीय महिलेने याबाबत फिर्याद…

Read More

तामिळनाडूत आमदारांना कार, ₹75 हजार मासिक भत्ता मिळणार:महिला आमदाराने सभागृहात गाणे गाऊन आभार मानले; विद्यार्थ्यांच्या आंदोलनांवर बंदीचा आदेश मागे

तामिळनाडू सरकारने बुधवारी सर्व आमदारांना सरकारी कार देण्याची आणि वाहनाच्या देखभालीसाठी, इंधनासाठी व चालकाच्या खर्चासाठी दरमहा 75 हजार रुपयांचा भत्ता देण्याची घोषणा केली. याव्यतिरिक्त, आमदारांना सहाय्यक ठेवण्यासाठी 25 हजार रुपये मासिक भत्ता देखील दिला जाईल. विधानसभेत आमदारांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले. याच दरम्यान, टीव्हीके (TVK) आमदार सिंधू यांनी तमिळ सुपरस्टार आणि माजी मुख्यमंत्री एम.जी….

Read More

कर्जमुक्ती योजनेत आधार प्रमाणीकरणाचा मार्ग सुकर:आपले सरकार केंद्र चालकाचा ठसा घेऊन तालुकास्तरीय समितीकडून होणार पडताळणी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत लाभ मिळवण्यासाठी आधार प्रमाणीकरण रखडलेल्या 3.18 लाख शेतकऱ्यांसाठी सहकार आयुक्त कार्यालयाने नवीन निर्णय घेतला असून आपले सरकार केंद्र चालकाच्या बोटाचा ठसा घेऊन शेतकऱ्याची तालुकास्तरीय समितीकडून पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. राज्यात पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये 16.66 लाख पात्र शेतकऱ्यांची पहिली…

Read More