Headlines

कळवण:मानूरला उद्यापासून हरिनाम सप्ताह

तालुक्यातील मानूर येथे दि. १८ ते २५ ऑगस्टपर्यंत २३ वा अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ग्रामदैवत हनुमानराय, मार्कडेश्वर भगवंत व ब्रह्मलिन स्वामी गोविंद भारती महाराज यांच्या कृपाशीर्वादाने तसेच स्वामी हर्षद भारती महाराज, शशिकांत मुडावदकर, नितीन मुडावदकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा होणार आहे. श्री मार्कडेश्वर बहुद्देशीय भजनी सेवा मंडळ,…

Read More

विद्यार्थ्यांनी संशोधनाची आवड जोपासणे आवश्यक:चांदवड येथे डॉ. चंद्रशेखर उपासनी यांचे आवाहन‎

‘भारतीय रसायनशास्त्राचे जनक’ आणि महान रसायनशास्त्रज्ञ सर प्रफुल्लचंद्र (पी. सी.) रे यांनी ‘बंगाल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स’ या भारतातील पहिल्या औषध कंपनीची स्थापना करून भारतीय औषध उद्योगाचा पाया रचला व स्वदेशी उद्योगाला दिशा दिली. विज्ञान, संशोधन आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या ऐतिहासिक कार्याची प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी समाजसेवेच्या भावनेतून वैज्ञानिक दृष्टिकोन व संशोधनाची आवड जोपासावी, असे आवाहन श्रीमान…

Read More

आईने मुलाला वाचवण्यासाठी किडनी दिली:मोहालीत ₹7 लाखांचे प्रत्यारोपण अयशस्वी, आता दोघेही आजारी; 1 बिघा जमीनही विकली

ज्या मुलाला जन्म दिला, त्याचे प्राण वाचवण्यासाठी आईने आपली किडनीही दिली. पण, मोहालीतील एका खाजगी रुग्णालयात केलेल्या प्रत्यारोपणानंतर किडनी निकामी झाली. अल्ताफची तब्येत बिघडत गेली, तेव्हा वडील त्याला घेऊन चंदीगड PGI मध्ये पोहोचले. येथे तो सलग 8 दिवस दाखल होता, पण त्याच्या स्थितीत सुधारणा झाली नाही. आता दर तिसऱ्या दिवशी बाहेरून डायलिसिस करावे लागत आहे….

Read More

लासलगाव रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांना होणारा त्रास थांबणार:मध्य रेल्वेचे उपप्रबंधक मुकेश कुमार मीना यांचे आश्वासन‎

रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांना सोडण्यासाठी किंवा तिकीट काढण्यासाठी येणाऱ्या वाहनांवर रेल्वे पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात असल्याच्या तक्रारींची योग्य ती दखल घेतली जाईल. प्रवाशांना त्रास होणार नाही, तसेच रेल्वे अंडरपासमधील खड्ड्यांवरही काम केले जाईल, असे आश्वासन मध्य रेल्वेचे उपप्रबंधक मुकेश कुमार मीना व अधिकाऱ्यांनी स्थानक पाहणीदरम्यान दिले. लासलगाव रेल्वे स्थानकाची पाहणी करण्यासाठी उपप्रबंधक मुकेश कुमार…

Read More

भोकणी ग्रामपंचायतीला राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार:जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पुरस्कार वितरण‎

सिन्नर तालुक्यातील ‘झाडाचे गाव’ म्हणून नावारूपाला आलेल्या भोकणी ग्रामपंचायतीला राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नाशिक आयुक्त कार्यालय, नाशिक येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी सरपंच अरुण वाघ व ग्रामसेवक योगेश राहाणे यांनी पुरस्कार स्वीकारला. वृक्षलागवड व संवर्धन, पर्यावरण संरक्षण, जलसंधारण…

Read More

हत्या:मालेगावात पूर्ववैमनस्यातून तरुणाची हत्या; चौघे ताब्यात

शहरातील पवारवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पूर्वीच्या वादातून २४ वर्षीय तरुणावर लोखंडी पाइपने हल्ला करून त्याची हत्या करण्यात आली. शनिवारी (दि. १५) सायंकाळी ६० फुटी रोडवरील पेट्रोलपंपाजवळ ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी सात संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून चौघांना ताब्यात घेतले आहे. त्यांना सोमवारी (दि. १७) न्यायालयात हजर केले जाणार आहे. मृत तरुणाचे नाव मोहम्मद जुबेर…

Read More

भाजपची सोनिया गांधींविरोधात पोलिसांत तक्रार:काँग्रेस मुख्यालयात वंदे मातरम थांबवल्याचा आरोप; देशभरात निदर्शने

भाजपने रविवारी सोनिया गांधींविरोधात बेंगळूरु आणि मंगळूरु येथे पोलिसांत तक्रार दाखल केली. बेंगळूरुमध्ये भाजप युवा मोर्चाने मल्लेश्वरम पोलिस ठाण्यात आणि मंगळूरुमध्ये भाजप नेत्यांनी उर्वा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. यात वंदे मातरमच्या अपमानाबद्दल कारवाईची मागणी करण्यात आली. पोलिसांनी अद्याप एफआयआर (FIR) नोंदवलेला नाही. भाजपने शनिवारी आरोप केला होता की, सोनिया गांधींनी स्वातंत्र्यदिनी काँग्रेस मुख्यालयात वंदे मातरम…

Read More

जानोरी- पाडळी रस्त्याची चाळण:खड्ड्यांत वृक्षारोपण करून आंदोलन

इगतपुरी तालुक्यातील जानोरी-पाडळी रस्त्याची दुरवस्था झाली असून, खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे वैभव धांडे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत अनोखे आंदोलन केले. रस्त्याची तातडीने दुरुस्ती न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी…

Read More

गवळीशिवरा:महारुद्र मारुतीच्या चरणी 1 लाख भाविक नतमस्तक

मराठवाड्याचे आराध्य दैवत असलेल्या श्रीक्षेत्र गवळीशिवरा येथील नवसाला पावणाऱ्या प्रसिद्ध महारुद्र मारुतीच्या दर्शनासाठी श्रावणमासातील पहिल्याच शनिवारी लाखो भाविकांची गर्दी झाली होती. विशेष म्हणजे श्रावणमासातील पहिल्या शनिवारी, १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त मंदिरात तिरंगी रंगाचे फुग्याची आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. सकाळपासून भाविकांच्या गर्दीने सर्व रस्ते फुलून निघाले होते. दरम्यान, श्रावण महिन्यात लहान मुले, महिला भाविक दूरवरून…

Read More

श्रावणाच्या पहिल्या शनिवारी खुलताबाद दुमदुमले:4 लाख भाविकांनी घेतले भद्रा मारुतीचे दर्शन

श्रावण महिन्याच्या पहिल्या शनिवारी खुलताबाद येथील प्रसिद्ध श्री भद्रा मारुती मंदिरामध्ये भाविकांचा जनसागर उसळला होता. पहाटेपासूनच सुरू झालेल्या दर्शनाच्या ओघाने रात्री उशिरापर्यंत संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने आणि ‘जय भद्रा, भद्रा हनुमान की जय’च्या जयघोषाने दुमदुमून गेला. १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मारुती रायाची केलेली आकर्षक तिरंगा फुलांची सजावट भाविकांचे मुख्य आकर्षण ठरली. शुक्रवारी रात्री १२…

Read More