Headlines

सेन्सेक्समध्ये 300 अंकांपेक्षा जास्त घसरण, 77,700 वर:निफ्टीही 50 अंकांनी घसरला; आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये जास्त विक्री

आज म्हणजेच 17 ऑगस्ट रोजी शेअर बाजारात घसरण आहे. सेन्सेक्स 300 अंकांनी अधिक घसरणीसह 77,700 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही 50 अंकांनी अधिक घसरण आहे, तो 24,300 वर व्यवहार करत आहे. आयटी, बँकिंग आणि एफएमसीजी शेअर्समध्ये जास्त विक्री आहे. आज आशियाई बाजारात वाढ 14 ऑगस्ट रोजी अमेरिकन बाजारात घसरण झाली होती परदेशी गुंतवणूकदारांनी 7…

Read More

महासंयोग:27 वर्षांनंतर पहिला श्रावणी सोमवार अन् नागपंचमी एकाच दिवशी‎; 16 ऑगस्ट 1999 नंतर पहिल्यांदाच जुळून आला दुर्मिळ मुहूर्त

यंदाच्या श्रावण महिन्याची सुरुवात अत्यंत दुर्मिळ‎आणि शुभ पर्वाने होत असून, पहिल्याच श्रावणी‎सोमवारी नागपंचमीचा महासंयोग तब्बल २७‎वर्षांनंतर जुळून आला आहे. यापूर्वी १६ ऑगस्ट‎१९९९ रोजी असा योग आला होता. धर्मशास्त्रानुसार‎एकाच दिवशी शिवपूजन आणि नागपूजन करणे‎भाविकांसाठी अत्यंत फलदायी मानले जाते. विशेष‎म्हणजे, याच दिवशी सकाळी ७ वाजून ५८‎मिनिटांनी सूर्य स्वतःच्या म्हणजेच //”सिंह’ राशीत‎प्रवेश करत आहे. या अनुकूल ग्रहमानामुळे‎शासनस्तरावर विद्यार्थ्यांच्या…

Read More

वैजापुरात अ‍ॅग्रो इंडस्ट्रीजच्या गोदामाला आग:सुमारे 1 लाख बारदाना भस्मसाथ

पहाटेच्या अंधारात अचानक धुराचे लोट उठले अन् काही वेळात ज्वाळांनी बारदानाचे गोदाम कवेत घेतले.शहरातील भाग्योदय अॅग्रो इंडस्ट्रीजमध्ये रविवारी (दि. १६) पहाटे घडलेल्या या अग्नितांडवाने मोठी खळबळ उडाली. सर्वप्रथम वॉचमनच्या नजरेस आग पडल्यानंतर धावाधाव सुरू झाली; मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. या दुर्घटनेत सुमारे एक लाख बारदान जळून ५० लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे…

Read More

पृथ्वीराज चव्हाणांना सध्या काही काम नाही:चर्चेत राहण्यासाठीच त्यांची धडपड; गोपीनाथ मुंडेंवरील दाव्यावरून बावनकुळे संतापले, रोहित पवारांवरही निशाणा

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या दाव्यावर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “पृथ्वीराज चव्हाण यांना सध्या काहीही काम उरलेले नाही, त्यामुळे केवळ मीडियामध्ये चर्चेत राहण्यासाठी ते अशी वक्तव्ये करत आहेत,” असा घणाघात बावनकुळे यांनी केला आहे. तसेच, राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांच्या…

Read More

दोन दिवसांत 12 हजार पर्यटकांची अजिंठ्यास भेट:वाहनतळाची जागा अपूर्ण पडल्याने वाहने रस्त्यावर‎

स्वातंत्र्य दिनासह सलग दोन दिवस सुट्या असल्याने पर्यटकांनी जगप्रसिद्ध अजिंठा लेणीला मोठी गर्दी केली होती. या दोन दिवसांत १२ हजार ५०० पर्यटकांनी लेणीला भेट दिली. पर्यटकांची संख्या वाढल्याने पर्यटन व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. पर्यटकांच्या वाहनांना जागा अपुरी पडल्याने वाहने जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर उभी करावी लागली. सलग सुट्यांमुळे अजिंठा लेणीमध्ये पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. पावसाळा…

Read More

17 वर्षीय प्रणवने 13 व्या वर्षापासून रोज सराव केला:गणितात वर्ल्ड टॉपर बनला; आता अमेरिकेने 3.55 कोटींची शिष्यवृत्ती दिली

तमिळनाडूतील इरोडच्या १७ वर्षीय प्रणव इलांगो याला अमेरिकेतील प्रतिष्ठित ब्राऊन युनिव्हर्सिटीकडून ३.५५ कोटी रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली. यात चार वर्षांच्या पदवीचा अभ्यास, ट्यूशन फी आणि राहण्याचा खर्च समाविष्ट आहे. प्रणवसाठी इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोपा नव्हता. त्याने १३ व्या वर्षी तयारीला सुरुवात केली. डेक्सटेरिटी ग्लोबलच्या नॅशनल एज्युकेटर डेव्हलपमेंट प्रोग्रामशी तो जोडला गेला. येथे त्याला आंतरराष्ट्रीय शिक्षणासाठी मार्गदर्शन…

Read More

शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या परीक्षेत विद्यार्थी नापास:भांबरवाडी जि. प. शाळेला मंत्री भुसे यांची अचानक भेट‎

शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे हे १४ ऑगस्ट रोजी भांबरवाडी जिल्हा परिषद शाळेवर सकाळी दहा वाजेच्या सुमारास अचानक धडकले. या वेळी शाळेच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची पीटी सुरू होती. शालेय शिक्षणमंत्री भुसे यांना अचानक शाळेच्या प्रांगणात पाहून शिक्षकांची एकच धावपळ उडाली. भुसे यांनी थेट विद्यार्थ्यांची संवाद साधला. काही प्रश्न विचारले. ज्या विद्यार्थ्यांनी उत्तर देण्यासाठी हात…

Read More

लाडगाव रोडवर दुचाकींची धडक:एक ठार, दोन जखमी

लाडगाव रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन एकाचा मृत्यू, तर दोघे जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. राहुल जगन्नाथ लिहिणार (३५, रा. लाडगाव रोड, वैजापूर) असे मृताचे नाव आहे.राहुल लिहिणार हे दुचाकीवरून जात असताना समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीशी त्यांची धडक झाली. अपघातात लिहिणार यांच्यासह चंद्रप्रकाश प्रजापती व सोमनाथ प्रेमदास…

Read More

भंडारदरा ‘फुल्ल’; रंधा, कळसुबाई अन् हरिश्चंद्रगड पर्यटकांनी गजबजले:जोडून आलेल्या सुट्यांमुळेसुमारे 15 ते 20 हजार पर्यटकांची हजेरी

शनिवार आणि रविवारची जोडून आलेली सुट्टी, त्यात पावसाळी वातावरण आणि निसर्गाचे खुललेले रूप यामुळे पर्यटकांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारदरा परिसरात रविवारी पर्यटकांची झुंबड उडाली. भंडारदरा धरण, रंधा धबधबा, कळसुबाई शिखर, हरिश्चंद्रगड, कोकणकडा, अमृतेश्वर मंदिर (रतनवाडी) यांसह विविध पर्यटनस्थळांवर सुमारे १५ ते २० हजार पर्यटकांनी हजेरी लावली. रंधा परिसरात पर्यटकांची गर्दी ओसंडून वाहत होती. पुणे,…

Read More

UP-MP सह 10 राज्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट:ओडिशात अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; 2.37 लाखांहून अधिकजण मदत शिबिरात

बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे नवीन क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे आयएमडीने ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील १५ जिल्ह्यांना सोमवारी अतिवृष्टीचा इशारा जारी केला आहे. याव्यतिरिक्त, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पूर्व मध्य प्रदेश, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेशालाही पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र, राजस्थान, गुजरात, पश्चिम मध्य प्रदेश, कर्नाटक आणि केरळमध्ये आज…

Read More