Headlines

पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर टेम्पोच्या धडकेत तरुणाचा मृत्यू:केसनंद फाटा परिसरात अपघात, चालक फरार

पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील केसनंद फाटा परिसरात भरधाव टेम्पोच्या धडकेत एका पादचारी तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना नुकतीच घडली असून, या प्रकरणी टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत तरुणाचे नाव अरफात इसतियाक अन्सारी (वय २०, रा. संत तुकारामनगर, केसनंद फाटा, वाघोली) असे आहे. अरफातचे मामा आसीफ नासीर अन्सारी (वय ४२) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात या…

Read More

Manoj Jarange Patil Warning To Govt Over Maratha Reservation

“मराठा समाजाला न्याय मिळाला नाही, तर वेळ आल्यास मराठे हे सरकार पाडतील. सरकारने मराठ्यांच्या 58 लाख नोंदींचे कुणबी प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी (जात पडताळणी) द्यायलाच हवी. जर यातील एकही नोंद सरकारने कमी केली, तर गंभीर परिणाम भोगावे लागतील,” असा थेट आणि अ . 20 ते 25 ऑगस्टदरम्यान मराठवाडा आणि विदर्भाचा दौरा आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी मनोज…

Read More

गोपीनाथ मुंडे भाजपच्या जाचाला कंटाळून काँग्रेसमध्ये जाणार होते:पृथ्वीराज चव्हाणांनंतर महादेव जानकरांचा खळबळजनक खुलासा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत दावा केला होता. या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. आता याच प्रकरणावर राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) नेते महादेव जानकर यांनी मोठा गौप्यस्फोट करत या आगीत आणखी तेल ओतले आहे. “गोपीनाथ मुंडे हे भाजपच्या जाचाला कंटाळले होते…

Read More

बिहारमध्ये जे झालं, तेच महाराष्ट्रात होण्याची भीती:बीएलओंच्या कामावरून रोहित पवारांचा गंभीर आरोप, टायपिंग परीक्षा घोळावरही संताप

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज विविध मुद्द्यांवरून राज्य सरकार, प्रशासन आणि भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली. मतदार याद्यांच्या SIR प्रक्रियेतील कथित गैरप्रकार, मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक टंकलेखन परीक्षेतील तांत्रिक गोंधळ, तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या काँग्रेसच्या माफीच्या मागणीवरून रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. या सर्व मुद्द्यांवर भूमिका मांडताना…

Read More

अभिजीत दीपकेंनी रिपब्लिकन पक्षात यावे:केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची थेट ऑफर, पेपरफुटीविरोधातील लढ्याचे केले कौतुक

नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीविरोधात आवाज उठवत स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन करणारे अभिजीत दीपके यांना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) मध्ये येण्याची खुली ऑफर दिली आहे. “अभिजीत दीपकेंनी आता रिपब्लिकन पक्षात आलं पाहिजे. रिपब्लिकन पक्ष हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा खरा पक्ष आहे,” असे आठवले यांनी स्पष्टपणे म्हटले. चिपळूण येथे पत्रकारांशी संवाद…

Read More

भाजपचे 80 नगरसेवक टाकता येतील एवढे मोठे खड्डे!:नाशिकच्या दुर्दशेवरून संजय राऊतांचे सरकारला सवाल- नाशिक हे चंद्रावरचे शहर आहे का?

नाशिक शहरातील रस्त्यांची दुर्दशा आणि खड्ड्यांमध्ये पडून झालेल्या मृत्यूंच्या सत्रावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी राज्य सरकार, स्थानिक प्रशासन आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर सडकून टीका केली आहे. “नाशिक शहरात प्रशासनाने लोकांना रस्त्यावरच ‘स्विमिंग पूल’ निर्माण करून दिले आहेत. मी असे काही खड्डे पाहिलेत, ज्यात भाजपचे 80 नगरसेवक आणि शिंदे गटाचे…

Read More

श्रावणी सोमवार, नागपंचमीच्या दुहेरी योगामुळे औंढ्यात भाविकांची गर्दी:सकाळी आकरा वाजेपर्यंत 40 हजार भाविकांनी घेतले नागनाथाचे दर्शन

देशातील आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येथे श्रावणातील पहिल्या सोमवारी ता. १७ भाविकांची मोर्ठी गर्दी झाली होती. सकाळी आकरा वाजेपर्यंत तब्बल ४० हजार भाविकांनी नागनाथाचे दर्शन घेतले. संपूर्ण देशभरातील भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आले आहेत. भाविकांच्या रांगा कायम आहेत. देशातील आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येथे श्रावण महिन्यात नागनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. भाविकांची गर्दी लक्षात…

Read More

मुंबईतील कांदिवलीमध्ये इमारतीला भीषण आग:11 जणांची सुखरूप सुटका, सुदैवाने जीवितहानी नाही

मुंबईतील कांदिवली पश्चिम परिसरातील स्टेशन रोडवर असलेल्या एका चार मजली कमर्शियल इमारतीत सोमवारी पहाटेच्या सुमारास आग लागल्याने खळबळ उडाली. सकाळी सुमारे ४.१४ वाजता आगीची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. आगीमुळे इमारतीत मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. दुसऱ्या मजल्यावरील लॉजिंगमधून ११ जणांची सुटका आगीच्या…

Read More

OBC नेत्यांची गोंडस मुलं, पैसा पाहून मराठा मुली घरात घुसतात:नवनाथ वाघमारेंच्या वक्तव्याने राज्यभरात संतापाची लाट, ठिकठिकाणी निषेध

ओबीसी समाजाचे नेते नवनाथ वाघमारे यांनी मराठा समाजाच्या तरुणींबद्दल अत्यंत आक्षेपार्ह आणि धक्कादायक विधान केले आहे. “ओबीसी नेत्यांची सुंदर मुले आणि पैसा पाहून मराठा समाजाच्या तरुणी त्यांच्या घरात घुसतात,” असे संतापजनक वक्तव्य वाघमारे यांनी केले आहे. या विधानानंतर राज्यभरात मोठा वाद पेटला असून, मराठा समाजातील महिला कमालीच्या आक्रमक झाल्या आहेत. ठिकठिकाणी वाघमारे यांच्या विरोधात निदर्शने…

Read More

श्रावणी सोमवारचा उत्साह:त्र्यंबकेश्वर ते घृष्णेश्वर… महादेवाच्या मंदिरांत भाविकांची मांदियाळी; रात्रीपासूनच रांगा, आकर्षक फुलांच्या सजावटीचे पाहा खास व्हिडीओ

पवित्र श्रावण महिना आणि त्यातच श्रावणी सोमवारचे औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रातील शिवमंदिरे ‘बम बम भोले’ आणि ‘हर हर महादेव’च्या गजराने दुमदुमून गेली आहेत. राज्यासह देशभरातून आलेल्या लाखो भाविकांनी आज महादेवाच्या दर्शनासाठी राज्यातील प्रमुख ज्योतिर्लिंग आणि शिवमंदिरांमध्ये अलोट गर्दी केली आहे. पहाटेपासूनच सुरू असलेल्या महापूजेमुळे आणि गाभाऱ्यात केलेल्या मनमोहक सजावटीमुळे भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये…

Read More