Headlines

श्रावणोत्सव:कुडलसंगमच्या धर्तीवर मांजरा नदीपात्रात उभारले जागृत "श्रीरामलिंगेश्वर'

तालुक्यातील जवळगा येथील मांजरा नदीपात्रात वसलेले श्रीरामलिंगेश्वर देवस्थान हे पंचक्रोशीतील एक जागृत आणि ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त असलेले एकमेव देवस्थान आहे. सध्या श्रावण महिना सुरू असल्याने या कुडलसंगमच्या धर्तीवर उभारलेल्या अनोख्या मंदिरात भाविकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळत आहे. जवळगा गाव पूर्वी दंडकारण्याचा भाग होते. दक्षिणेकडे जाताना प्रभू रामचंद्रांनी नदीपात्रात रामलिंगेश्वराच्या पिंडीची स्थापना केल्याची आख्यायिका…

Read More

बंगालमधील बीरभूम येथील हॉटेलला आग, 7 जणांचा मृत्यू:सकाळी 4.30 वाजता दुर्घटना; श्रावण सोमवारी तारापीठ मंदिरात पोहोचले होते भाविक

पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यात एका हॉटेलला आग लागली. या दुर्घटनेत सात लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले आहेत. आग लागण्याचे कारण एसीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याचे सांगितले जात आहे. माहितीनुसार, श्रावण सोमवारच्या निमित्ताने मोठ्या संख्येने भाविक तारापीठ मंदिरात पोहोचले होते. ते येथील एका हॉटेलमध्ये थांबले होते. सकाळी जेव्हा ते झोपले होते तेव्हा पहाटे सुमारे…

Read More

ध्वजारोहणानंतर परतताना टेम्पोच्या धडकेत शिक्षक ठार:कुर्डुवाडी-करमाळा रस्त्यावर ढवळसपाटीजवळ अपघात‎

स्वातंत्र्यदिनाचा ध्वजवंदनाचा कार्यक्रम आटोपून घरी परतताना रस्ता ओलांडत असताना दुचाकीला टेम्पोने दिलेल्या धडकेत शिक्षक ठार झाले. हा अपघात शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ढवळस पाटी चौकात घडला. या अपघातात जय जगदंबा विद्यालय ढवळस (ता. माढा) येथील सहशिक्षक संजय बाळकृष्ण कांबळे (रा. भोसरे, ता. माढा) यांचा मृत्यू झाला. ​याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शनिवारी (दि. १५) रोजी…

Read More

कर्जमुक्ती योजनेत 66,147 शेतकऱ्यांना 627.40 कोटी:2.41 हजार कोटी‎रुपयांच्या माफीची प्रतीक्षा‎

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतर्गत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ६६ हजार १४७ थकीत पीक कर्जदार शेतकरी सभासदांच्या खात्यावर ६२७.४७ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. जिल्हा बँकेच्या २७७ शाखांमार्फत १३६६ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमधील पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला. बँकेच्या प्रशासक संगिता डोंगरे यांनी ही माहिती दिली. शासनाकडून आधारप्रमाणीकरणासाठी…

Read More

साखरपुडा केला, 2.60 लाख उकळले:नवरी मात्र अल्पवयीन‌!

विवाहाचे स्थळ दाखवून घरगुती साखरपुडा केला, लग्नाची तारीखही निश्चित केली आणि त्यानंतर मुलीच्या आजीच्या उपचारांसाठी पैशांची गरज असल्याचे सांगून तब्बल २ लाख ६० हजार रुपये घेतल्याची धक्कादायक घटना श्रीरामपुरात समोर आली आहे. विशेष म्हणजे, पोलिस तपासात नवरी मुलगी १७ वर्षांची अल्पवयीन असल्याचे तसेच तिच्यासोबत आलेले आई, मावशी व भाऊ म्हणून सांगितलेले व्यक्ती तिचे नातेवाईक नसल्याचे…

Read More

बिहारमधील लखीसरायमध्ये चेंगराचेंगरीत 7 महिलांचा मृत्यू:मंदिरात जलाभिषेकासाठी हजारो भाविक जमले, विजेचा खांब कोसळल्याने वीज पसरली

बिहारमधील लखीसराय येथे सोमवारी झालेल्या चेंगराचेंगरीत 7 महिलांचा मृत्यू झाला. 12 हून अधिक लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना अशोकधाम स्टेशनवरून मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली. रात्री या रस्त्यावर विजेचा खांब कोसळला होता. हजारो लोक मंदिराच्या रांगेत उभे असतानाच खांबामध्ये वीजप्रवाह पसरला. यानंतर गोंधळ उडाला आणि लोक…

Read More

नाशिक:खेळताना पाण्याच्या टाकीतपडून नाशकात बहिणींचा मृत्यू

घराच्या आवारात खेळत असलेल्या दोन चिमुकल्या सख्या बहिणींचा जमिनीखालील पाण्याच्या टाकीत पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना माने नगर परिसरात घडली. तृप्ती विशाल सोनवणे(८) अाणि श्रास्वी विशाल सोनवणे (४) अशी या दाेघी सख्ख्या बहिणींची नावे आहेत. अयोध्या नगरी, माने नगर येथे डाॅ. विशाल सोनवणे हे पत्नी अाणि दोन मुलींसह राहतात. जवळच त्यांचे क्लिनिक अाहे. १५…

Read More

कळवण:मानूरला उद्यापासून हरिनाम सप्ताह

तालुक्यातील मानूर येथे दि. १८ ते २५ ऑगस्टपर्यंत २३ वा अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ग्रामदैवत हनुमानराय, मार्कडेश्वर भगवंत व ब्रह्मलिन स्वामी गोविंद भारती महाराज यांच्या कृपाशीर्वादाने तसेच स्वामी हर्षद भारती महाराज, शशिकांत मुडावदकर, नितीन मुडावदकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा होणार आहे. श्री मार्कडेश्वर बहुद्देशीय भजनी सेवा मंडळ,…

Read More

विद्यार्थ्यांनी संशोधनाची आवड जोपासणे आवश्यक:चांदवड येथे डॉ. चंद्रशेखर उपासनी यांचे आवाहन‎

‘भारतीय रसायनशास्त्राचे जनक’ आणि महान रसायनशास्त्रज्ञ सर प्रफुल्लचंद्र (पी. सी.) रे यांनी ‘बंगाल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स’ या भारतातील पहिल्या औषध कंपनीची स्थापना करून भारतीय औषध उद्योगाचा पाया रचला व स्वदेशी उद्योगाला दिशा दिली. विज्ञान, संशोधन आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या ऐतिहासिक कार्याची प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी समाजसेवेच्या भावनेतून वैज्ञानिक दृष्टिकोन व संशोधनाची आवड जोपासावी, असे आवाहन श्रीमान…

Read More

आईने मुलाला वाचवण्यासाठी किडनी दिली:मोहालीत ₹7 लाखांचे प्रत्यारोपण अयशस्वी, आता दोघेही आजारी; 1 बिघा जमीनही विकली

ज्या मुलाला जन्म दिला, त्याचे प्राण वाचवण्यासाठी आईने आपली किडनीही दिली. पण, मोहालीतील एका खाजगी रुग्णालयात केलेल्या प्रत्यारोपणानंतर किडनी निकामी झाली. अल्ताफची तब्येत बिघडत गेली, तेव्हा वडील त्याला घेऊन चंदीगड PGI मध्ये पोहोचले. येथे तो सलग 8 दिवस दाखल होता, पण त्याच्या स्थितीत सुधारणा झाली नाही. आता दर तिसऱ्या दिवशी बाहेरून डायलिसिस करावे लागत आहे….

Read More