अनावरण:पैठणला अण्णा भाऊ साठे यांच्या 12.5 फूट उंच पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचा जागर पैठण शहरात शनिवारी झाला. मातंग समाजाच्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीला मूर्त रूप देत शहरात उभारण्यात आलेल्या अण्णा भाऊ साठे यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे शनिवार, १५ ऑगस्ट रोजी दिमाखात अनावरण करण्यात आले. छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदिपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास आमदार विलास भुमरे, नगराध्यक्ष विद्याभूषण कावसानकर, विनोद…