हिंगोलीत 19 जनावरांची सुटका:कत्तलीच्या संशयावरून राजकीय कार्यकर्त्यावर गुन्हा
वसमत तालुक्यातील जवळा खंदारबन शिवारातील एका राजकिय पक्षाच्या कार्यकर्त्याच्या शेतातून कत्तलीच्या उद्देशाने बांधलेली १९ जनावरे वसमत ग्रामीण पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतली आहे. या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. ३० गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील जवळा खंदारबन शिवारात सय्यद इमरान याच्या शेतात कत्तलीसाठी नेण्याच्या उद्देशाने काही जनावरे बांधण्यात आल्याची माहिती…