विदर्भ, मराठवाड्यात पुढील 24 तासांत 'फ्लॅश फ्लड'चा इशारा:नदी-नाल्यांना अचानक पूर येण्याची शक्यता; हवामान विभागाचा अलर्ट
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) नवी दिल्ली येथील ‘फ्लॅश फ्लड गायडन्स सेल’ने ३० जुलै २०२६ रोजी एक राष्ट्रीय बुलेटिन जारी केले आहे. त्यानुसार, महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या मध्य प्रदेश व गुजरातच्या सीमेवरील काही भागांत पुढील २४ तासांत ‘फ्लॅश फ्लड’ म्हणजेच अचानक पूर येण्याचा मोठा धोका वर्तवण्यात आला आहे. हा इशारा अत्यंत महत्त्वाचा मानला…