Headlines

पंतप्रधान म्हणाले- प्रत्येक राज्य पेपरफुटीमुळे त्रस्त:शिक्षणासंदर्भात सातत्याने पावले उचलत आहोत; दोन्ही सभागृहांमध्ये पेपरफुटी सुधारणा विधेयक मंजूर

संसदेच्या दोन्ही सभागृहांनी पेपरफुटी रोखण्याचे विधेयक मंजूर केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी गुरुवारी रात्री १०:४० वाजता इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला. ते म्हणाले: दशकांपासून प्रत्येक राज्य आणि केंद्र सरकारला अशा पेपरफुटीच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. यामुळे मुलांच्या भविष्यालाही धोका निर्माण होत आहे. हे सर्व लक्षात घेता, देशभरात, सर्व राज्यांमध्ये आणि केंद्रीय स्तरावर शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करणे…

Read More

अमित शाह यांच्या पुणे दौऱ्यापूर्वी आढावा बैठक:महापालिका प्रशासनाकडून सुरक्षा व सुविधांचा आढावा घेण्यात आला

देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आगामी पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील सुरक्षा व्यवस्था तसेच आवश्यक नागरी सुविधांचा आढावा घेण्यासाठी पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली गुरवारी आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये केंद्रीय गृहमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागांतील रस्ते स्वच्छता, नालेसफाई, ड्रेनेज व्यवस्था, रस्त्यांवरील खड्डे, अनधिकृत होर्डिंग्ज तसेच अतिक्रमणे याबाबत सविस्तर…

Read More

रमाई आवास योजनेच्या पहिल्या हप्त्यात वाढ:लाभार्थ्यांना आता मिळणार 50 हजार रुपये; पालकमंत्री संजय शिरसाट यांची घोषणा

छत्रपती संभाजीनगर येथे रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आयोजित लाभ वितरण समारंभात एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली. या योजनेअंतर्गत घरबांधणीसाठी दिला जाणारा पहिला हप्ता २५ हजार रुपयांवरून ५० हजार रुपये करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिली. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम…

Read More

खरगे म्हणाले– शिक्षण संस्थांमध्ये मनुस्मृती मानणारे वाढले:शूद्रांकडून शिक्षणाचा अधिकार हिरावला; नड्डा म्हणाले- पुरावा द्या, सभापतींनी रेकॉर्डमधून काढले

राज्यसभेत पेपरफुटीशी संबंधित परीक्षा सुधारणा विधेयकावरील चर्चेदरम्यान मल्लिकार्जुन खरगे यांच्या ‘मनुस्मृती’ विधानावरून गदारोळ झाला. ते शैक्षणिक संस्थांवरील RSS च्या हस्तक्षेपावर बोलत होते. त्यांनी सांगितले की, शिक्षण संस्थांमध्ये मनुस्मृती मानणाऱ्यांची संख्या वाढली आहे, यामुळे शूद्रांना शिक्षणाचा अधिकार हिरावून घेतला गेला आहे. यावर सभागृहात गदारोळ सुरू झाला. जे.पी. नड्डा यांनी मध्येच थांबवत म्हटले की, खरगे यांचे विधान…

Read More

मिटमिटा झूलॉजिकल पार्कमध्ये 3 हजार वृक्षांची लागवड:वृक्षारोपण सप्ताहाची सांगता; पर्यटन विकासाला चालना

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत राबवलेल्या वृक्षारोपण सप्ताहाची सांगता मिटमिटा येथील प्रस्तावित झूलॉजिकल पार्क परिसरात ३ हजार वृक्षारोपण करून करण्यात आली. हा सप्ताह २२ ते २९ जुलै २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमास महापौर समीर राजूरकर,…

Read More

विद्यापीठाचा आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना मदतीचा हात:शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी शिष्यवृत्ती, 17 ऑगस्टपर्यंत अर्ज करा

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि हुशार विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती योजना जाहीर केल्या आहेत. यामध्ये विद्यार्थी विकास निधी शिष्यवृत्ती, विद्याधन योजना, स्व. प्रा. रामप्रकाश श्यामलाल राठी स्मृती शिष्यवृत्ती योजना, संत गाडगे बाबा शिक्षण संरक्षण योजना, विद्यार्थिनी बस पास सवलत योजना आणि संत गाडगे बाबा कमवा व शिका योजना यांचा समावेश आहे. शैक्षणिक सत्र…

Read More

NEET Exam Scam Ruling; Bombay High Court Fines Students

‘नीट’ (NEET) फेरपरीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीत गैरव्यवहार होऊन गुण कमी मिळाल्याचा आरोप करणाऱ्या चार विद्यार्थ्यांचा दावा अखेर उच्च न्यायालयात फेटाळला गेला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने या याचिका पूर्णपणे निराधार असल्याचे . परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेली ओएमआर उत्तरपत्रिका त्यांनी प्रत्यक्ष परीक्षेत भरलेल्या उत्तरपत्रिकेपेक्षा वेगळी होती. बीड येथील सोहम गावटे याने त्याला ९५…

Read More

अमरावती जिल्ह्यात पाऊस कमी, सरासरीच्या 72% पर्जन्यमान:मोर्शी धरणात 4.5% जलसाठा कमी, पाणीटंचाईची भीती

अमरावती जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून अधूनमधून पाऊस सुरू असला तरी, त्यापूर्वीच्या आठवडाभराच्या उघडीपमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जुलैच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर वार्षिक सरासरी गाठण्याच्या जवळ पोहोचलेले पर्जन्यमान पुन्हा खाली घसरले असून ते ७२.६ टक्क्यांवर आले आहे. यामुळे जिल्ह्यातील जलसाठ्यातही घट झाली आहे. जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या मोर्शी तालुक्यातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा (सिंभोरा) धरणातील जलसाठा…

Read More

युवक काँग्रेसचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन:'नीट' नंतर FDA परीक्षेत घोळ, कठोर कारवाईची मागणी

‘नीट’ पेपरफुटीचे प्रकरण ताजे असतानाच, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) घेण्यात आलेल्या अन्न व औषध प्रशासन (FDA) औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतही घोळ झाल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसने गुरुवारी अमरावती येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. परीक्षा होण्यापूर्वीच पेपर फोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात आली. आंदोलनाच्या शेवटी अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद…

Read More

सेवाज्येष्ठ शिक्षकांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा:उच्च न्यायालयाच्या निकालानंतर शासन निर्णय जारी, 31 ऑगस्टपूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश

अमरावतीसह राज्यभरातील शिक्षकांच्या रखडलेल्या पदोन्नती प्रक्रियेला अखेर गती मिळाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निकालानंतर राज्याच्या शिक्षण विभागाने बुधवारी याबाबतचा शासन निर्णय जारी केला. त्यानुसार, ३१ ऑगस्टपूर्वी पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अमरावती जिल्हा परिषदेचे शिक्षक तथा शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश खेरडे आणि इतरांनी यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल…

Read More