Headlines

भारतातील 117 प्रभावशाली महिलांकडे 39 लाख कोटी:वारसा हक्काने नाही, स्वतःच्या बळावर 84% महिलांनी स्वतःची साम्राज्ये केली उभी

आतापर्यंत अनेक दशकांपर्यंत भारतातील प्रभावशाली महिलांच्या यादीत व्यावसायिक घराण्यांच्या वारसदार, प्रवर्तक कुटुंबे आणि कॉर्पोरेट जगातील दिग्गजांचे वर्चस्व होते. परंतु आता प्रभाव आणि यश केवळ व्यावसायिक घराण्यांच्या वारशापुरते मर्यादित राहिलेले नाही. उद्योजक, स्टार्टअप संस्थापक, व्यावसायिक सीईओपासून ते ऑलिम्पिक पदक विजेते, पत्रकार, लेखिका, डिजिटल क्रिएटर आणि कार्यकर्त्यांचाही यात समावेश आहे. 2026 च्या कॅन्डेरे हुरुन इंडिया वुमन लीडर्स…

Read More

मुमताज@79, अमिताभसाठी सोडली मर्सिडीज:शम्मी कपूरचा प्रस्ताव नाकारला, पण त्यांच्या पत्नीच्या सूचनेनुसार शेवटच्या भेटल्या, जाणून घ्या किस्से

70-80 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री मुमताज आज 79 वर्षांच्या झाल्या आहेत. त्या काळात मुमताज यांची इतकी लोकप्रियता होती की, त्यांनी चित्रपटांमध्ये परिधान केलेले कपडे ट्रेंड बनत असत. सौंदर्य असे होते की यश चोप्रा, शम्मी कपूर यांसारखे लोकही तिला लग्नाचा प्रस्ताव देण्यास कचरत नव्हते. पण काम आणि करिअरसाठी वेड्या मुमताजने प्रत्येक प्रस्ताव नाकारला. मात्र, एक काळ…

Read More

मुंबई हायकोर्टातील कॅन्टीन तपासणीपूर्वीच बंद:एफडीएचे पथक पोहोचले, आम्हीच बंदचा निर्णय घेतला- बॉम्बे बार असोसिएशन

हायकोर्टाच्या दणक्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे गुरुवारी अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) अधिकारी या न्यायालयाच्या आवारातील बॉम्बे बार असोसिएशनच्या (बीबीए) वकिलांच्या कॅन्टीनच्या पाहणीसाठी पोहोचले होते. पाहणीपूर्वीच कॅन्टीनने आपली सेवा तात्पुरती बंद केली होती. हा निर्णय आम्ही स्वयंस्फूर्तीने घेतल्याचा दावा असोसिएशनने केला आहे. बॉम्बे बार असोसिएशनचे सचिव नौशाद इंजिनियर यांनी एका निवेदनात सांगितले की, कॅन्टीन बंद करण्याचे…

Read More

भाजपच्या सर्व्हेत यूपीत 52-67 जागांचे नुकसान:सत्ताविरोधी लाट टाळण्यासाठी 35% आमदारांचे तिकीट कापण्याची सूचना

यूपी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या अहवालानुसार, सध्याच्या परिस्थितीत निवडणुका झाल्यास भाजपला बहुमतासाठी संघर्ष करावा लागू शकतो. थेट 52 ते 67 जागांचे नुकसान होऊ शकते. भाजपला 190 ते 205 जागा मिळत आहेत. बहुमतासाठी 202 जागांची आवश्यकता आहे. 2022 च्या निवडणुकीत भाजपला 255 जागा मिळाल्या…

Read More

पाडळीत ठाकरवाडी रस्त्यावर चिखल:ग्रामस्थ, विद्यार्थी त्रस्त; राया फाउंडेशनसह पालकांचे प्रशासनाला निवेदन‎

सिन्नर तालुक्यातील पाडळी गावातील मारुती मंदिरापासून ठाकरवाडी वस्तीकडे जाणारा प्रमुख रस्ता सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत असून, पावसामुळे तो पूर्णपणे चिखलमय झाला आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडले असून, काही ठिकाणी रस्ता वाहून गेला आहे. या रस्त्यावरून दररोज ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थी आणि विविध कामानिमित्त ये-जा करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः जिल्हा परिषद…

Read More

गुरुमंत्र दीक्षा:गुरुपूजनाने चंद्रेश्वर गडावर गुरुपौर्णिमा उत्सव साजरा

येथील पुरातन श्रीक्षेत्र चंद्रेश्वर गडावरील श्री चंद्रेश्वर महादेव मंदिरात सालाबादप्रमाणे यंदाही बुधवारी (दि. २९) गुरुपौर्णिमा उत्सव सोहळा अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. महामुनी भगवान कपिलमुनीजी व श्रीगुरु चंद्रेश्वर बाबांच्या कृपाशीर्वादाने, महंत बन्सीपुरीजी महाराज यांच्या प्रेरणेने आणि स्वामी जयदेवपुरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा धार्मिक उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. या मंगलप्रसंगी आलेल्या…

Read More

नाशकात खड्ड्यांमुळे 5 मृत्यू; ठाकरे गटाचे आंदोलन:दोषींवर कठोर कारवाई होणार; कोणाचीही गय करणार नाही- गिरीश महाजन

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमुळे शहरातील रस्त्यांची विदारक स्थिती झाली आहे. त्यामुळे अपघातात ५ जणांनी जीव गमावले. त्याच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटाने गुरुवारी महापालिका प्रशासनाविरोधा आंदोलन केले. खडयांमुळे मृत पावलेल्या व्यक्तींचे फोटो सोबत आणत ते महापौर दालनातील खुर्चीवर ठेवण्यात आले. प्रशासन किती जणांचा बळी घेणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. दोषींवर कठोर कारवाई होणार- गिरीश महाजन खड्ड्यांमुळे…

Read More

गुगलचा नवा पर्सनल असिस्टंट मीटिंग नोट्स, ईमेल्स लिहिणार:जथोम गंगटे मेक्सिकोतील भारताचे नवे राजदूत, 31 जुलैच्या घडामोडी

आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. एन.जी.जे. गंगटे मेक्सिकोमध्ये भारताचे नवीन राजदूत निवृत्ती (RETIREMENT) 2. अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती क्रीडा (SPORTS) 3. भारताने एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक जिंकले निधन (DEATH) 4. GOT फेम टॉम चॅडबोन यांचे निधन इतर (Miscellaneous) 5. गुगलने भारतात ‘जेमिनी…

Read More

ओव्हरफ्लो:हरणबारीतून 6,221 क्युसेक विसर्ग, मोसमवरील 15 बंधारे तुडूंब

हरणबारी धरण शंभर टक्के भरल्याने ओव्हरफ्लो झाले आहे. धरणाच्या सांडव्यावरून ६,२२१ क्युसेसचा विसर्ग सुरु आहे. मोसम नदीवरील जवळपास १५ बंधारे तुडूंब भरल्याने २५ पेक्षा अधिक गावातील सार्वजनिक पाणी पुरवठा योजनांना पिण्याच्या पाण्याचे संकट दूर झाले आहे. २५ पेक्षा अधिक गावातील सार्वजनिक पाणी पुरवठा योजनांना लाभ. बागलाण तालुक्यात मुसळधार पाऊस झाला नसला तरी हरणबारी पाणलोट क्षेत्रात…

Read More

‘मॉर्निंग वॉक’ला जाणाऱ्या महिलेचे दीड लाखाचे गंठण पळवले:बजाजनगरमध्ये पान शॉप फोडले; 2. 33 लाखांचा ऐवज लंपास

शहरात मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या महिलांमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात हुडी गँग या नव्या टोळीने दहशत माजवली असून, वाळूज परिसरातील सिडको महानगरात मंगळवारी (२८ जुलै) सकाळी एका ५४ वर्षांच्या महिलेच्या गळ्यातील १ लाख ४४ हजार रुपयांचे सोन्याचे मिनी गंठण हिसकावल्याची घटना घडली. या प्रकारामुळे पोलिसांच्या सकाळच्या गस्तीचा (मॉर्निंग पेट्रोलिंग) फज्जा उडाल्याचे स्पष्ट झाले…

Read More