Headlines

चितेगाव-पांगरा रस्त्याची दुरवस्था:विद्यार्थ्यांचे हाल, पालकांकडून संताप व्यक्त

परिसरात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे चितेगाव-पांगरा आणि चितेगाव-बोकूडजळगाव या प्रमुख रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. या मार्गांवर अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचले असून, शालेय विद्यार्थी, वाहनचालक आणि नागरिकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने पाण्याखालील खड्ड्यांचा नेमका अंदाज येत नाही, ज्यामुळे येथे अपघातांचा मोठा धोका निर्माण झाला आहे….

Read More

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेत 37% शेतकऱ्यांचीच ‘ई-केवायसी’ पूर्ण

राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी जिल्ह्यातील तब्बल १ लाख ५ हजार पात्र शेतकऱ्यांपैकी २९ जुलैअखेर अवघ्या ३९ हजार २६६ (३७%) शेतकऱ्यांचीच ‘ई-केवायसी’ पूर्ण झाली आहे. शेतकऱ्यांना कर्ज रकमेत असलेली तफावत, वेगवेगळ्या बँकांचे कर्ज, केंद्रचालकांकडून केली जाणारी अडवणूक यामुळे केवायसीच्या प्रक्रियेत अडचण निर्माण होत आहे. ६५,८६२ शेतकरी अजूनही केवायसीच्या प्रतीक्षेत आहेत. एखाद्या शेतकऱ्याला…

Read More

भंडाफोड:कोल्हापुरात डॉक्टरने केले 200 हून अधिक बेकायदेशीर गर्भपात, डमी रुग्णाच्या साहाय्याने उघडकीस आला प्रकार

कोल्हापूर जिल्ह्यात अवैध गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा करवीर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. कदमवाडी रोडवरील “प्रतिमा हॉस्पिटल’वर पोलिसांनी छापा टाकून डॉ. चंद्रकांत गायकवाड याच्या मुसक्या आवळल्या आहेत. प्राथमिक चौकशीत या डॉक्टरने आतापर्यंत २०० ते २५० बेकायदेशीर गर्भपात केल्याची धक्कादायक कबुली दिली आहे. विशेष म्हणजे, डॉ. गायकवाड याने यापूर्वी विविध जिल्ह्यांत सिव्हिल…

Read More

री-नीटचा निकाल योग्य असल्याचे सिद्ध:4 विद्यार्थ्यांना खंडपीठाचा दंड, पाहणीत मूळ उत्तरपत्रिका अन् एनटीएचे गुण तंतोतंत जुळले

राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (एनटीए) घेतलेल्या री-नीटच्या गुणपत्रात फेरफार आणि निकालात त्रुटी असल्याचा दावा करणाऱ्या ४ विद्यार्थ्यांचे आरोप बिनबुडाचे आणि चुकीच्या माहितीच्या आधारे असल्याचे स्पष्ट झाल्याने न्यायालयाचा वेळ वाया घालवल्याबद्दल न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी आणि न्या. आबासाहेब शिंदे यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्या विद्यार्थ्यांच्या ४ याचिका फेटाळून लावल्या. त्याचबरोबर औरंगाबाद खंडपीठाने प्रत्येक याचिकाकर्त्याला ५,००० रुपये दंडात्मक खर्च ठोठावला आहे….

Read More

मंत्र्यांच्या दालनात ई-पेपर; 1 सप्टेंबरपासून छापील वृत्तपत्रे बंद:राज्य सरकारचा निर्णय, वृत्तपत्र विक्रेते संघटनेचा आंदोलनाचा इशारा

महाराष्ट्र सरकारने डिजिटल प्रशासनाकडे पाऊल टाकत कागद आणि खर्चाच्या बचतीसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. येत्या १ सप्टेंबरपासून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व मंत्री आणि राज्यमंत्र्यांच्या मंत्रालयीन कार्यालयांत तसेच शासकीय निवासस्थानी राज्य सरकारकडून पुरवली जाणारी छापील वृत्तपत्रे व नियतकालिके पूर्णपणे बंद केली जाणार आहेत. यापुढे मंत्र्यांना वृत्तपत्रांचे ऑनलाइन सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल. सामान्य…

Read More

हात आहेत, पण पायांवर चालते वंदनाचे जीवन:शरीराला थरकाप, जीभही साथ देत नाही; अखेरची इच्छा- अमिताभ बच्चनची भेट घेणे

दुर्मीळ आजारांच्या मालिकेतील- ‘ऐ जिंदगी’ मध्ये आज वंदना कटारियाची कहाणी. यासाठी मी नीरज झा गुजरातच्या जैतपूर शहरात पोहोचलो आहे- वेळ- संध्याकाळचे साधारण 4 वाजले होते. मुसळधार पाऊस पडत होता. जैतपूरच्या अरुंद गल्ल्यांमधून जाताना एका व्यक्तीला विचारले- वंदना कटारियाचे घर कुठे आहे? त्याने एका जुन्या तीन मजली इमारतीकडे बोट दाखवत सांगितले- कोपऱ्यावरचे ते दुकान वंदना दीदींचे…

Read More

आयकरदाते 94 हजार शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र ठरले:सहकार विभागाकडून 32 लाख बळीराजाची डेटा पडताळणी

राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’तून राज्यातील ९४,०८३ शेतकऱ्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. कारण सहकार विभागाने ३१ लाख ६४ हजार २८ शेतकऱ्यांची डेटा पडताळणी केली. त्यात हे शेतकरी आयकरदाते असल्याचे स्पष्ट झाले आहे. या अपात्रतेमुळे राज्य सरकारचे १,८८१ कोटी ६६ लाख रुपये वाचले आहेत. या योजनेसाठी राज्य सरकारने ३६,५८५ कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय…

Read More

नाशिकमध्ये गुरुवारी दोनदा भूकंपाचे धक्के:6 दिवसांत 10 वा हादरा बसला; सुरगाणा तालुक्यात भूकंपाचे केंद्र

नाशिक जिल्ह्यात भूकंपाच्या धक्क्यांचे सत्र कायम असून गुरुवारी (३० जुलै) दोन भूकंपाचे धक्के बसले. पहिला धक्का पहाटे २.३७ वाजून ४१ सेकंदांनी ३.८ रिश्टर तीव्रतेचा होता. तर दुसरा धक्का सायंकाळी ५ वाजून ५८ मिनिटांनी जाणवला. याची तीव्रता ३.१ रिश्चर स्केल होती. जिल्ह्यात गत ६ दिवसात एकुण १० वेळा भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिक घाबरले आहेत. गुरुवारच्या भूकंपाचा…

Read More

पावसाचा धुमाकूळ:नाशिक घाटमाथ्यावर आज रेड अलर्ट, संभाजीनगरला यलो अलर्ट; जळगाव-विदर्भातही मुसळधारेचा इशारा

राज्यात सलग ८ व्या दिवशीही पावसाने हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगरात २४ तासात २७.६, जळगावात ४० मिमी पाऊस झाला. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यात तसेच नाशिकमध्ये रिमझिम सुरू होती. मुसळधार पावसामुळे विदर्भ जलमय झाला असून गडचिरोलीत पूरस्थिती निर्माण झाली. नांदेड जिल्ह्यातील उमरी बाजार मंडळात (ता. किनवट) अतिवृष्टी झाली. महाराष्ट्रात जून, जुलै महिन्यामध्ये गेल्या ५ वर्षातील सर्वात कमी पाऊस…

Read More

ईश्वरपूर नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांना दिलासा:पद रद्द करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशला स्थगिती, नगरविकास विभागाचा निर्णय

ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्यावरील अपात्रतेच्या कारवाईला नगरविकास विभागाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे पुढील सुनावणी होईपर्यंत त्यांचे नगराध्यक्षपद कायम राहणार आहे. काही दिवसांपूर्वी सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी बांधकाम अनियमिततेच्या आरोपांवरून त्यांना अपात्र ठरवले होते. मात्र नगरविकास विभागाच्या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा मिळाला आहे. सांगलीचे जिल्हाधिकारी मैनाक घोष यांनी कथित बांधकाम अनियमिततेच्या प्रकरणात आनंदराव मलगुंडे…

Read More