Headlines

विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहून उज्ज्वल भविष्य घडवावे‎:अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. डी. चव्हाण यांचे प्रतिपादन, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

अहिल्यानगर विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल घडविण्यासाठी शिक्षणाबरोबरच चांगले संस्कार, कायद्याचे ज्ञान आणि व्यसनमुक्त जीवनशैली तितकीच महत्त्वाची आहे. व्यसनामुळे केवळ व्यक्तीचेच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाचे आणि समाजाचेही मोठे नुकसान होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या अमली पदार्थांपासून आणि व्यसनांपासून कायम दूर राहून वाचन, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम आणि सकारात्मक छंदांचा अंगीकार करावा, असे आवाहन जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र…

Read More

उपाध्याय प्रविणऋषीजींचा ऐतिहासिक “समर्पण चातुर्मास’ मंगल प्रवेश:17 वर्षांनंतर प्रवीणऋषीजींचा अहिल्यानगरमध्ये प्रवेश, भाविकांच्या गर्दीने दुमदुमली आनंदधाम नगरी‎

जैन धर्मातील अतिशय पवित्र आणि मंगलमय समजल्या जाणाऱ्या ‘समर्पण चातुर्मासा’ निमित्त उपाध्याय प्रवर पूज्य प्रविणऋषीजी यांचा रविवारी सकाळी आनंदधामच्या प्रांगणात ऐतिहासिक मंगल प्रवेश झाला. विनायक नगर (बोरा फार्म) येथून निघालेल्या या मंगल प्रवेश सोहळ्याने . तब्बल १७ वर्षांनंतर उपाध्यायश्री आपल्या गुरूदेवांच्या पुण्यभूमीत चातुर्मासासाठी विराजमान झाल्यामुळे नगरकर भाविकांमध्ये अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. या शोभायात्रेत अर्हम विज्जा…

Read More

सीए अजय मुथा यांची नवी दिल्लीच्या "डायरेक्ट टॅक्स कमिटी'वर निवड:अहिल्यानगरला मिळाला राष्ट्रीय पातळीवर मोठा बहुमान‎

चार्टर्ड अकाउंटंट्स क्षेत्रातील सर्वोच्च संस्था असणाऱ्या ‘द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया’ (आयसीएआय), नवी दिल्लीच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या ‘डायरेक्ट टॅक्स कमिटी’च्या (डीटीसी) सदस्यपदी अहिल्यानगरचे सुपुत्र सीए, आयपी अजय मुथा यांची निवड झाली. ही समिती प्रामुख्याने आयसीएआयच्या वतीने भारत सरकारचे अर्थ मंत्रालय आणि केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (सीबीडीटी) यांना इन्कम टॅक्स आणि…

Read More

श. प. राष्ट्रवादी एनडीएच्या वाटेवर असल्याची चर्चा:शहा यांना सुळेंनंतर तटकरेही भेटले, केंद्रात एक अन् राज्यात दोन मंत्रिपदांची गणितं?

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या नेतृत्वातील ‘एनडीए’त सहभागी होण्याच्या हालचाली तीव्र केल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली. सोमवारी सायंकाळी खासदार सुप्रिया सुळे, बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरेंनीही शहा यांची स्वतंत्र भेट घेतल्याने राजकीय भूकंपाची चर्चा वाढली आहे. चार दिवसांपूर्वी शरद पवारांनी दिल्लीत विद्यार्थी आंदोलक…

Read More

दावा- सरकारने प्रधान यांचे मंत्रालय बदलण्याचा प्रस्ताव ठेवला होता:पण CJP राजीनाम्यावर ठाम राहिली; म्हटले- कोणतीही तडतोड करणार नाही

नीट पेपरफुटीच्या वादामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा २५ जुलै रोजी झाला. मात्र, इंडियन एक्सप्रेसच्या एका अहवालात दावा करण्यात आला आहे की, राजीनाम्यापूर्वी केंद्र सरकारने विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या कॉकरोच जनता पार्टी (CJP) सोबत समझोता करण्याचा प्रयत्न केला होता. रिपोर्टनुसार, सरकारला असे वाटत होते की धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षण मंत्रालयातून काढून दुसऱ्या मंत्रालयाची…

Read More

माढ्यात प्रशासकीय इमारतीचे काम निकृष्ट:ठिकठिकाणी पडले मोठे तडे, ठेकेदार, प्रशासन, लोकप्रतिनिधी त्रिसूत्रीची रंगतेय चर्चा‎

. माढा शहरात सुरू असलेल्या प्रशासकीय इमारतीचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू असून इमारतीच्या बांधकामाला ठिकठिकाणी मोठमोठे तडे पडले आहेत. सर्वच शासकीय कार्यालये एकाच छताखाली व्हावीत, यासाठी माजी आमदार बबनराव शिंदे यांनी विशेष पाठपुरावा करून जुन्या तहसील कार्यालयाच्या ठिकाणी नव्या प्रशासकीय इमारतीला मंजुरी मिळवली. स्व. अजित पवार यांच्या माध्यमातून प्रशासकीय इमारतीला मान्यता मिळवून पहिल्या टप्प्यात…

Read More

वडापूर बंधाऱ्याचे बॅरेज अन् उंच पुलात रूपांतर करावे:आमदार समाधान आवताडे यांची मागणी‎

भीमा नदीवरील मौजे वडापूर (ता. दक्षिण सोलापूर) येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये रूपांतर करण्याचे काम प्रस्तावित आहे. या पार्श्वभूमीवर, पुराच्या काळातही वाहतूक सुरळीत राहण्यासाठी येथे उच्च पातळीवरील नवीन पूल उभारण्यात यावा, अशी आग्रही मागणी आमदार समाधान आवताडे यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. आमदार आवताडे यांनी निवेदनात म्हटले आहे की, हा…

Read More

गुरुपौर्णिमेनिमित्त यात्रीनिवासचे बुकिंग फुल्ल:अन्नछत्र 12 तास सेवेत, श्री स्वामी समर्थ मंदिर, अन्नछत्र मंडळासह समाधी मठाची गुरुपौर्णिमा उत्सवाची तयारी उत्साहात

श्री गुरुपौर्णिमा निमित्त येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरासह समाधी मठ व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने जय्यत तयारी केली आहे. भक्तनिवास, यात्री निवासाचे बुकिंग फुल्ल झाले असल्याचे व्यवस्थापनाने कळवले आहे. स्वामी समर्थांचे मंदिरात होणारी भाव . श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान येथे बुधवारी मंदिरात नित्य नियमाने होणारी काकड आरती पहाटे ४ वाजता होईल. गर्दी…

Read More

गोपाळपूर येथे 2 टन कचरा संकलित:स्वच्छ वारी, निर्मल वारी, हरित वारी अभियान ठरले यशस्वी‎

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या निर्देशानुसार आणि ‘स्वेरी’चे संस्थापक व प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (स्वेरी) पंढरपूरच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत दि. २२ जुलै रोजी गोपाळपूर येथे ‘स्वच्छ वारी, निर्मल वारी, हरित वारी’ हे स्वच्छता अभियान उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून…

Read More

अक्कलकोटमध्ये संस्कृती बालगुडे यांच्या संभवामि युगे युगे नृत्याविष्काराने मंत्रमुग्ध:स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा वर्धापन दिन सोहळा; गुणवंतांचाही सत्कार

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा ३९ वा वर्धापन दिन व गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त आयोजित धर्मसंकीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रमात सिने अभिनेत्री संस्कृती बालगुडे आणि सहकलाकार (पुणे) प्रस्तुत ‘संभवामि युगे युगे’ या नृत्याविष्काराचे नववे पुष्प उत्साहात पा . हा सोहळा न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली पार पडत…

Read More