- Marathi News
- National
- Fire In A Hotel In Delhi… No Chance Of Rescue, 22 People Including 11 Foreigners Died, Permission Was Given For The Hotel For 6 Rooms, 25 Were Built
नवी दिल्ली28 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

दक्षिण दिल्लीतील मालवीय नगर येथे असलेल्या फ्लोरीश स्टे ‘बी अँड बी’ हॉटेलमध्ये बुधवारी सकाळी लागलेल्या आगीत २२ लोकांचा मृत्यू झाला. ‘बेड एंड ब्रेकफास्ट’ योजनेअंतर्गत या हॉटेलला ६ खोल्यांची मंजुरी होती, पण येथे २५ पेक्षा जास्त खोल्या आढळल्या. हॉटेलकडे फायर एनओसी नव्हती आणि येण्या-जाण्यासाठी एकच रस्ता होता. मृतांमध्ये ११ विदेशी नागरिक आणि ११ भारतीय आहेत.
परदेशी नागरिकांमध्ये ९ आफ्रिकन देशांतील आणि २ तुर्कमेनिस्तानचे नागरिक आहेत. मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी केली जाईल. पोलिसांनी हॉटेल मालक लवकेश बजाज आणि इतरांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून बजाजला अटक केली आहे. आग लागण्याचे कारण उशिरा रात्रीपर्यंत स्पष्ट होऊ शकले नव्हते. याचा तपास सुरू आहे.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, सकाळी ८:३० वाजता आग लागली. काही मिनिटांतच धूर संपूर्ण इमारतीत पसरला. वरच्या मजल्यांवर थांबलेल्या लोकांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. फायर सर्व्हिस, पोलीस आणि स्थानिक लोकांनी ५८ लोकांना बाहेर काढले. यामध्ये ३५ जण जखमी आहेत. या दरम्यान १० पोलीस कर्मचारीही जखमी झाले. मॅक्स हॉस्पिटलने सांगितले की, ३९ लोकांना आणले गेले होते, ज्यापैकी १८ जणांचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. १५ जण आयसीयूमध्ये दाखल असून त्यापैकी ८ जण व्हेंटिलेटरवर आहेत.
हायकोर्टाने जानेवारीत मागितला होता ॲक्शन प्लॅन, ५ महिन्यांत घटना
- दिल्ली हायकोर्टात दाखल एका जनहित याचिकेत असा दावा केला की, राजधानीत १००० परवानाधारक हॉटेल्स आणि गेस्ट हाऊस आहेत, परंतु केवळ ५२ कडेच वैध फायर एनओसी आहे.
- या याचिकेवरील सुनावणी दरम्यान या वर्षी ७ जानेवारी रोजी न्यायालयाने दिल्ली सरकार, एमसीडी आणि एनडीएमसीला फायर सेफ्टीवर कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले होते.
- याचिकाकर्ते वकील अर्पित भार्गव यांचे म्हणणे होते की, हॉटेल्स आणि गेस्ट हाऊस अग्नि सुरक्षा मानकांशिवाय चालत आहेत.
सरकार धोरण बदलणार; आजपासून सीलिंगही होणार
- दिल्लीचे पर्यटन मंत्री कपिल मिश्रा यांनी सांगितले की, बेड अँड ब्रेकफास्ट पॉलिसी असलेल्या आस्थापनांची तपासणी केली जाईल. ६ पेक्षा जास्त खोल्या आढळल्यास परवाना रद्द करणार.
- एमसीडी दक्षिण दिल्लीत गुरुवारपासून अवैध इमारतींचे सीलिंग सुरू करेल. आग लागलेल्या हॉटेलचा नकाशा मंजूर नव्हता.
वडिलांच्या भेटीला आलेल्या ७ जणांचा मृत्यू
- गुरुग्रामच्या सेक्टर-४६ मधील रहिवासी असलेले सीए विवेक अग्रवाल मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल वडिलांना भेटायला आले होते. कुटुंब याच हॉटेलमध्ये थांबले होते. आगीत विवेक, त्यांची पत्नी तर्जनी, आई, दोन मुली, मामा व मावशी कमला यांचा मृत्यू झाला.
- राजस्थानच्या अजमेरचे व्यावसायिक अशोक पंसारी (६४), त्यांच्या आत्या, काकांचाही अग्निकांडात मृत्यू झाला. या सर्वांचे नातलग रुग्णालयात दाखल होते.
निष्काळजीपणाची आग…
फायर ब्रिगेड पोहोचण्यापूर्वीच स्थानिक लोक बचावासाठी सरसावले. हॉटेलसमोर ब्लँकेट व गाद्यांचे दुकान चालवणाऱ्या अरमानने दुकानातील सर्व नवीन गाद्या, रजाया काढून रस्त्यावर पसरवल्या. अरमानने सांगितले की, हॉटेलच्या वरच्या मजल्यावरून अनेक लोक याच गाद्यांवर पडल्याने त्यांचे जीव वाचले. भाजप आमदार सतीश उपाध्याय यांनी सांगितले की, स्थानिक तरुण अफजल, शाहरूख, अनिस, आमीर आणि वसीम यांनी लोकांना बाहेर काढण्यास मदत केली आणि किमान १० लोांना सीपीआर देखील दिला.