![]()
शिर्डीहून छत्रपती संभाजीनगरकडे भरधाव जाणाऱ्या कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार समृद्धीमहामार्ग चॅनल क्रमांक ५६-५७मधील समृद्धी महामार्गावरून थेट पुलाखाली जाऊन पडली. यात मुंबई येथील दोन जण ठार, तर पाच जणगंभीर जखमी झाले. ही घटना शिल्लेगाव पोलिसठाण्याच्या हद्दीतील खडकनारळाडोणगावजवळील समृद्धी मार्गाच्यापुलाखाली रविवारी सकाळी घडली. या घटनेत हुमेरा मोहसीन शेख(३१, रा. कल्याण) व हरिम जुनेदअहमद (८, रा. ठाणे मुंबई) असे ठारझालेल्या मृताचे नाव आहे. सर्व जखमींना तत्काळ छत्रपतीसंभाजीनगर येथील शासकीय घाटीरुग्णालयात उपचारासाठी दाखलकरण्यात आले आहे. चालकाचेनियंत्रण सुटल्यामुळे हा अपघातझाल्याचे पोलिसांनी सांगितले. याअपघातातील जखमींवर तातडीनेउपचार सुरु करण्यात आले आहेत.जखमींपैकी काही जणांची प्रकृतीगंभीर असल्याचे सूत्रांनी सांगितले.या अपघाताची उशिरापर्यंत नोंदघेण्याचे काम सुरू होते.
Source link
समृद्धी महामार्गावर कार पुलावरून कोसळली:दोघे जागीच ठार, खडकनारळा डोणगावजवळ घडलेली घटना