![]()
येथील पंचायत समिती एकात्मिक बाल विकास कार्यालयाला (आयसीडीएस) ८ जून रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली होती. आगीत लाडकी बहीण, लेक लाडकी योजनांचे हजारो अर्ज, पोषण आहार, बेबी किट्स व अंगणवाडी सेविकांच्या नोंदवह्या जळून खाक झाल्या. कार्यालयामार्फत विविध योजनांतील अर्जसुद्धा जळाले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. संशयास्पद बाब म्हणजे आगीच्या दोन दिवस आधीच कार्यालयाचा वीजपुरवठा बंद होता. शॉर्टसर्किटशिवाय आग लागली कशी, आर्थिक घोटाळा लपविण्यासाठी आग लावली का, असा संशय दिलेल्या निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे. निवेदन विभागीय आयुक्त, मुख्य कार्यपालन अधिकारी, जिल्हा परिषद अमरावती यांनासुद्धा देण्यात आले. या निवेदनानुसार घटनेपूर्वी दोन दिवस आधीच कार्यालयातील विद्युत मीटर काढून वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. मग शॉर्टसर्किटमुळे आग लागली कशी. प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्यासाठी संपूर्ण फाईल सीआयडीकडे वर्ग करावी. दोषी आढळल्यास कठोर फौजदारी कारवाई करावी. जळालेल्या कागदपत्रांमुळे कोणत्याही लाभार्थी महिला, विद्यार्थी, युवकांना योजनेचा लाभ नाकारू नये. इत्यादी मागण्या करण्यात आल्या आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव कॉ. श्याम शिंदे यांनी जिल्हाधिकारी अमरावती यांना निवेदन दिले. निवेदन देतेवेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष नांदगाव खंडेश्वर तालुका सचिव कॉ. श्याम शिंदे, माकप राज्य कमिटी सदस्य कॉ. सुभाष पांडे, माकप शहर सचिव मोहसीन शेख, दिलीप महल्ले, अशोक केसरखाने, शहेनशहा, शैलेश कटाने, किशोर शिंदे होते.
Source link
बाल विकास कार्यालयातील आगप्रकरणी चौकशी करावी:माकपची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी