Headlines

बुलेट ट्रेनसाठी देशात पहिल्यांदाच ‘टनेल हूड्स’ तंत्रज्ञानाचा वापर!:अत्याधुनिक सुविधेमुळे प्रवाशांचा प्रवास शांत आणि आरामदायी होणार




मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत भारतात पहिल्यांदाच डोंगराळ बोगद्यांच्या प्रवेशद्वारांवर प्रगत “टनेल हूड्स’ तंत्रज्ञान बसवण्यात येत आहे. ३०० किमी/तास पेक्षा जास्त वेगाने धावणारी ट्रेन जेव्हा बोगद्यात प्रवेश करेल तेव्हा सिलिंडरमधील पिस्टनप्रमाणे हवेचा प्रचंड दाब निर्माण होतो. या दबावामुळे ट्रेन बाहेर पडताना होणारा तीव्र “टनेल बूम’ (धडधडणारा आवाज) आणि हादरे रोखण्याचे मोठे काम हे हूड्स करणार आहेत. या अत्याधुनिक सुविधेमुळे प्रवाशांचा प्रवास तर शांत आणि आरामदायी होईलच, शिवाय बोगद्याच्या आसपास राहणाऱ्या स्थानिक नागरिकांना आणि पर्यावरणालाही या आवाजाचा कोणताही त्रास होणार नाही. भारतात पहिल्यांदाच रेल्वे बोगद्यांसाठी अशा प्रकारची प्रगत वायुगतिकीय रचना वापरण्यात येत आहे. (इन्फो : विनोद यादव) दृष्टिक्षेपात बोगदा असा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *