![]()
चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा लगतच्या पांढरी गावातील दोन शेतकरी चारगड नाल्यावरील पुलावरून जात असताना पुराच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेल्याची हृदयद्रावक घटना रविवारी (दि.२९) रात्री दहा वाजताच्या सुमारासघडली. या घटनेतील एका शेतकऱ्याचा मृतदेह सोमवारी (दि.३०) सकाळी सापडला असून,दुसऱ्या शेतकऱ्याचा शोध सुरू आहे. मध्यप्रदेशातील सातपुडा पर्वत राजीत झालेल्या मुसळधार पावसामुळे मेघा नदीसह परिसरातील नदी,नाले दुथडी भरून वाहत असल्याने ही घटना घडली आहे. रवींद्र रामभाऊ आवारे (वय ५५) असे मृतशेतकऱ्याचे, तर गोपाल निर्वार असे बेपत्ता असलेल्याशेतकऱ्याचे नाव आहे. हे दोघेही पांढरी गावातीलरहीवासी आहेत. गोपाल निर्वार आणि रवींद्र आवारे हेरविवारी सायंकाळी काही कामानिमीत्त गावातूनशिरजगाव कसबा येथे आले होते. दरम्यान रात्री सुमारेदहा वाजताच्या सुमारास शिरसगाव कसबा येथून पायीमूळ गावी पांढरीकडे निघाले होते. शिरजगाव ते पांढरी मार्गावरील चारगड नाल्याला मुसळधार पावसामुळेमोठा पूर आला होता. पुराच्या पाण्याचा अंदाज नआल्याने पुल ओलांडताना दोघेही वेगवान प्रवाहातवाहून गेले. सोमवारी सकाळपासून ग्रामस्थ आणि प्रशासनाने शोधमोहीम सुरू केली. घटनास्थळापासूनसुमारे दोन किलोमीटर अंतरावर सुधाकर सावरकरयांच्या शेताजवळ नाल्यातील काटेरी झुडपात रवींद्रआवारे यांचा मृतदेह अडकलेल्या अवस्थेत आढळूनआला. मात्र गोपालनिर्वार यांचा सोमवारी सायंकाळपर्यंत शोध लागला नसून डीडीआरएफ पथक आणि स्थानिक नागरिकांकडून शोधकार्य सुरू होते. मात्र सोमवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास शिरजगाव भागात पुन्हा जोरदार पाऊस झाला, त्यामुळे शोधकार्यात अडथळा निर्माण झाला होता व नंतर सायंकाळ झाल्यामुळे शोधकार्य थांबवण्यात आले असून मंगळवारी सकाळपासून पुन्हा शोध सुरू होणार आहे. सोमवारी रात्री घटनास्थळी उपविभागीय अधिकारी बळवंत आरखराव, तहसीलदार योगेश गाडे, शिरजगावचे प्रभारी ठाणेदार प्रमोद राऊत, मंडळ अधिकारी परवेज पठाण तसेच महसूल व पोलीस विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. रविवारी रात्री दोन ते तीन तास झालेल्या मुसळधार पावसामुळे करजगाव व शिरजगाव महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. या दोन्ही महसूल मंडळात प्रत्येकी ८३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. २ ते ४ दरम्यान जोरदार पावसाची शक्यता
अमरावती व आजूबाजूच्या जिल्ह्यात २ ते ४ जुलै दरम्यानमध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. बंगालच्याखाडीवर कमी दाबाचा पट्टा सक्रीय होत आहे. त्यामुळेचजिल्ह्यात व परिसरात तीन दिवस जोरदार पावसाचीशक्यता आहे. वाहतूक ठप्प, मध्यरात्री दोनवाजेपर्यंत गाव अंधारात
रविवारी रात्री सुमारे दोन तास मुसळधारपाऊस झाल्याने ब्राह्मणवाडाथडी–शिरसगाव–परतवाडा मार्गावरीलअनेक नाल्यांना पूर आला. त्यामुळे यामार्गावरील वाहतूक चार ते पाच तास पूर्णपणेठप्प झाली. शिरसगाव येथीलअंगणवाडीतही पुराचे पाणी शिरले. रात्रीआठ वाजल्यापासून वीजपुरवठा खंडितझाल्याने ग्रामस्थांना मध्यरात्री दोन वाजेपर्यंतअंधाराचा सामना करावा लागला. शिरजगावात शिरले पाणी
मध्यप्रदेशातील सातपुडा पर्वतपरिसरात झालेल्या मुसळधारपावसामुळे मेघा नदीला मोठा पूरआला. त्याचा परिणाम सीमेलगतच्याशिरसगाव कसबा परिसरावर झाला.परिसरातील नाले-नद्या दुथडी भरूनवाहू लागल्याने गावालगतच्या नाल्याचेपाणी थेट आठवडी बाजार परिसरातघुसले. इनसाइड स्टोरी
दुचाकी शिरजगावात ठेवून पायीनिघाले तरीही काळाने गाठले
पांढरी ते शिरजगाव हे अंतर तीन किमी आहे.पांढरी गावकऱ्यांची मुख्य बाजारपेठचशिरजगाव असल्यामुळे पांढरी ग्रामस्थ नेहमीचशिरजगावात येत असतात. त्यामुळेच रविंद्रआणि गोपाल हे दोघे काही कामानिमीत्तशिरजगावला दुचाकीने आले होते. मात्र रात्रीमुसळधार पाऊस सुरू झाल्यामुळे त्यांनीदुचाकी शिरजगावातच ठेवून पायी गावीजाण्याचे ठरवले. मात्र मार्गात असलेल्यानाल्यावर पुल ओलांडताना पाण्याचा अंदाज नआल्यामुळे दोघेही पाण्यात वाहत गेले.
दिव्य मराठी एक्सपर्ट
डॉ. प्रवीणकुमार, हवामान शास्त्रज्ञ, आरएमसी, नागपूर.
Source link
ढगफुटीसदृश पाऊस; 1 मृत, 1 बेपत्ता!:करजगाव, शिरजगावात 83 मिमी पावसाची नोंद, चारगड नाल्याला पूर आल्याने घडली घटना