Headlines

पावसाळी अधिवेशन:विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात; राज्यातील विनापरवाना IVF केंद्रांवर सभागृहात गंभीर चर्चा




राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू झाला आहे. काल काल अधिवेशनात अयोध्या राम मंदिरातील कथित दानपेटी गैरव्यवहार, शेतकरी कर्जमाफी, नगरविकास विभागातील कथित भ्रष्टाचार आणि कुंभमेळा निधी यांसारख्या अनेक मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. दरम्यान, राज्यातील वाढत्या बालगुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गुन्हेगारांचे वय १८ वरून १६ वर्षे करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार असून, लहान मुलांकडून गुन्हे करून घेणाऱ्या टोळ्यांवर थेट ‘मोक्का’ (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्याची मोठी घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली. “मंदिर रामभक्तांनी बांधलं, भाजपने दानपेटी लुटली!” अधिवेशनाच्या सुरुवातीलाच अयोध्या राम मंदिरातील कथित दानपेटी गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीचे आमदार अत्यंत आक्रमक झाले. विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर एकत्र येत सरकारच्या विरोधात जोरदार आंदोलन केले. “मंदिर रामभक्तांनी बांधलं, पण भाजपने दानपेटी लुटली” अशा घोषणा देत विरोधकांनी परिसर दणाणून सोडला. याशिवाय नगरविकास विभागातील कथित भ्रष्टाचार, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न आणि कुंभमेळा प्राधिकरणासाठीच्या निधीवरून विरोधी पक्षांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे अपडेट्स पाहण्यासाठी खालील लाइव्ह ब्लॉगमधून जा..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *