देशात सध्या भाजप आणि काँग्रेस हे दोनच प्रमुख पक्ष उरले असून 2029 ची आगामी निवडणूक याच दोन पक्षाच्या माध्यमातून लढली जाईल. इंडिया आघाडीतील सर्व पक्षांनी एकत्रितपणे भाजपविरोधात लढावे, हीच काँग्रेसची भूमिका आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपका
.
नाशिकमधील एका घटनेचा हवाला देत हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोटेपणाचा आरोप केला. ते म्हणाले, नाशिक परिसरात ढगफुटी होणार आहे, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी तिथल्या शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र, प्रत्यक्षात तिथे कोणतीही ढगफुटी झाली नाही. काँग्रेसचे आंदोलन दडपण्यासाठी आणि आमची अडवणूक करण्यासाठीच पोलिसांनी या खोट्या इशाऱ्याचा आधार घेतला. यावरून राज्यात खोटे कोण बोलत आहे, हे स्पष्ट दिसून येते.

त्यांनी लग्न केले का?
हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक जुन्या घोषणांची आठवण करून देत त्यांच्यावर निशाणा साधला सपकाळ म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेससोबत कधीच युती करणार नाही, अजित पवारांना जेलमध्ये टाकू, असे म्हणणारे आज कुठे आहेत? मुख्यमंत्री झाल्यावर पहिली सही धनगर आरक्षणावर करेन, असे फडणवीस म्हणाले होते; त्याचे काय झाले? मग खोटे कोण बोलले? जोपर्यंत वेगळा विदर्भ होत नाही, तोपर्यंत मी लग्न करणार नाही, असेही कोणीतरी म्हटले होते. आता त्यांनी लग्न केले की नाही? असा खोचक सवाल सपकाळ यांनी केला आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत दीड हजारांऐवजी 2100 रुपये देण्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली होती, मात्र प्रत्यक्षात महिलांच्या पदरी काहीच पडले नाही, असा आरोपही त्यांनी केला.
मराठा आरक्षणावरही जनतेची फसवणूक
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात वारंवार कोण खोटे बोलत आहे हे सुद्धा सर्वांना माहिती आहे. जो पर्यंत वेगळा विदर्भ होणार नाही तो पर्यंत मी लग्न करणार नाही असे कोणीतरी म्हणाले होते. आता त्यांनी लग्न केले का? असे म्हणत सपकाळ यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. लाडकी बहीणीला दीड ऐवजी 2100 रुपये देणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते पण तसे काही झाले नाही.