Headlines

सटाण्यातील 12 प्रभागांत जंतुनाशक फवारणी:डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनिया प्रतिबंधासाठी नगरपरिषदेची व्यापक मोहीम‎




पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया व चिकुनगुनिया यांसारख्या साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सटाणा नगरपरिषदेने डास निर्मूलनाची व्यापक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत मंगळवारी शहरातील सर्व १२ प्रभागांमध्ये एकाच वेळी ७ ट्रॅक्टर ब्लोअरच्या माध्यमातून द्रवरूप जंतुनाशक फवारणीला प्रारंभ करण्यात आला. शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून नगराध्यक्षा हर्षदा पाटील यांच्या हस्ते मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष सुमित वाघ, आरोग्य सभापती सोनाली दत्तू बैताडे यांच्यासह विषय समिती सभापती, पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी व नागरिक उपस्थित होते. पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन नगरपरिषदेने सात ट्रॅक्टर ब्लोअर कार्यान्वित केले आहेत. या अत्याधुनिक यंत्रणेमुळे शहरातील प्रत्येक प्रभाग, गल्ली आणि वस्तीमध्ये कमी वेळेत प्रभावीपणे जंतुनाशक फवारणी करणे शक्य होणार आहे. यावेळी शिवसेना गटनेते राहुलबाबा पाटील, भाजप गटनेते चेतन रौंदळ, श्री देवमामलेदार गटनेत्या मनिषा पवार, पाणीपुरवठा सभापती भूषण सोनवणे, वाचनालय व शिक्षण सभापती चेतन मोरे, महिला व बालकल्याण सभापती कल्पना सोनवणे आदींसह नगरसेवक, सर्व विभागप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते. नागरिकांनी सहकार्य करावे : हर्षदा पाटील शहरातील नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे ही नगरपरिषदेची सर्वोच्च जबाबदारी आहे. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ही व्यापक मोहीम राबविण्यात येत असून, नागरिकांनी घर व परिसरात पाणी साचू न देता पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा हर्षदा पाटील यांनी केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *