Headlines

पैठण येथे पोलिसांचे रस्ता सुरक्षा अभियान:जनजागृतीचे शहरभर कौतुक




पैठण शहरातील रस्ते अपघात कमी करण्यासाठी आणि वाहतूक नियमांबद्दल नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी १५ जुलै रोजी पैठण पोलिस प्रशासनाच्या वतीने एक विशेष रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात आले. डीवायएसपी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय पवार, पीएसआय सारंग, हेड कॉन्स्टेबल चेडे, ढाकणे, पोलिस कॉन्स्टेबल शिंदे, दुबाले, पठाण, भोजने व खिळे यांनी दुपारी ३ ते ६ या वेळेत शहरातील प्रमुख चौकांमध्ये ही मोहीम राबवली. महेश चौक, सह्याद्री फाटा आणि गोलनाका या वर्दळीच्या ठिकाणी पोलिसांनी नाकेबंदी न करता, थेट वाहनधारकांशी संवाद साधला. वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या आणि हेल्मेट-सीटबेल्ट वापरणाऱ्या चालकांना पोलिसांनी सन्मानपूर्वक गुलाबपुष्प देऊन त्यांचे कौतुक केले. यावेळी पोलिसांनी वाहनधारकांना मद्यपान करून वाहन न चालवणे, वेगमर्यादेचे पालन करणे, वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळणे आणि पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यास मदत करणे अशा विविध नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले. पोलिसांच्या या जनजागृतीचे शहरभर कौतुक होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *