Headlines

सोनोशीत फुगडी खेळत निघाली बालवारकऱ्यांची वारी:दिंडीतून दिला संस्कार अन् संस्कृतीचा संदेश; शिष्यवृत्ती-नवोदय पात्र विद्यार्थ्यांचा सन्मान‎



ज्ञान, संस्कार आणि संस्कृती यांचा संगम साधत पाथर्डी तालुक्यातील सोनोशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने आयोजित केलेला पायी दिंडी सोहळा समाज परिवर्तनाचा आणि संस्कारांची पेरणी करणारा प्रेरणादायी उत्सव ठरला. या दिंडीमुळे संपूर्ण सोनोशी गाव हरिनामाच्या गजरात

.

दिंडीत विद्यार्थ्यांनी लेझीम, टिपरी आणि टाळ नृत्याद्वारे वारकरी संस्कृतीचे जिवंत दर्शन घडवले. भारुड व विविध सादरीकरणांतून संतांचे विचार मांडत असताना बालकांच्या चेहऱ्यावरील शिस्त आणि भक्ती लक्ष वेधून घेत होती. आजच्या धावपळीच्या युगात केवळ पुस्तकी ज्ञान न देता मुलांना नम्रता, संयम, समता आणि सहकार्य ही जीवनमूल्ये शिकवण्याचा हा प्रयत्न ठरला.

पालक आणि आजी-आजोबांनी विद्यार्थ्यांवर फुलांचा वर्षाव केला. पाथर्डीचे शालेय पोषण आहार तालुका अधीक्षक व शिक्षणविस्तार अधिकारी रामनाथ कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. जेव्हा शाळा आणि समाज एकत्र येतात, तेव्हाच खऱ्या अर्थाने गुणवत्तापूर्ण शिक्षण साध्य होते, असे ते म्हणाले. या प्रसंगी पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेले विद्यार्थी आणि नवोदय विद्यालयात प्रवेश पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला. शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे व शाळेच्या उपक्रमशील धोरणामुळे हे यश मिळाल्याचे मुख्याध्यापक देविदास बडे यांनी सांगितले. शिक्षकांसह ग्रामपंचायत सोनोशी, ब्रम्हनाथ यात्रा कमिटी, शाळा व्यवस्थापन समिती आणि स्थानिक तरुण मित्र मंडळाच्या सहकार्यामुळे हा सोहळा यशस्वी झाला. सोनोशीकरांचा हा प्रतिसाद उद्याच्या उज्ज्वल भविष्याचे लक्षण ठरला आहे. शाळेचे शिक्षक दिलीप फुंदे, अमोल भंडारी, बाबासाहेब खेडकर, नारायण दहिफळे आणि अण्णासाहेब साळुंके यांनी या दिंडी व विद्यार्थ्यांच्या नियोजनासाठी परिश्रम घेतले. या कार्यास ग्रामपंचायत सोनोशी, ब्रम्हनाथ यात्रा कमिटी व शाळा व्यवस्थापन समिती, स्थानिक तरुण मित्र मंडळाचे सहकार्य लाभले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *