Headlines

सिल्लोड येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात आषाढी दिंडी सोहळा:विद्यार्थ्यांना संस्कृतीची ओळख व्हावी या उद्देशाने आयोजन‎




येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा करत विठ्ठल-रखुमाईच्या जयघोषात, टाळ-मृदंगाच्या गजरात आषाढी एकादशीनिमित्त दिंडी काढली. सोबतच शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम, कीर्तन, भजन आयोजित करण्यात आले. विठू नामाच्या गजराने आणि टाळ-मृदंगाच्या नादाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. शाळेच्या प्रांगणातून विठ्ठल-रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन करून पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. ‘ज्ञानोबा माउली तुकाराम’ आणि ‘पुंडलिक वरदे हरि विठ्ठल’ या जयघोषासोबतच स्वच्छतेचे महत्त्व दर्शवणारे फलक या दिंडीत विशेष आकर्षण ठरले. शाळेच्या प्रांगणात दिंडी काढण्यात आली. पालकांनी पालखीचे दर्शन घेतले आणि बाल वारकऱ्यांचे औक्षण करून स्वागत केले. शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी रिंगण सोहळा साजरा केला तसेच विठ्ठल नामाचा गजर करत विद्यार्थ्यांनी फुगड्या, झिम्मा यांसारखे पारंपरिक खेळ खेळले. याप्रसंगी पायल मरकडे, गौरी घोडके, श्रुती बनकर, शुभ्रा पैठणकर, श्रावणी नाकिरे, तनुजा नेमाडे, आराध्या वानखेडे, ईश्वरी वेंडोले, वैष्णवी नेमाडे, वेदाली दरड, आरोही मतलबे, तनुश्री बेलेकर, सोनाक्षी पात्रे, ऐश्वर्या ठाले, ईश्वरी कुदळ, सोनाक्षी कल्याणकर, विधी कल्याणकर, देवयानी भाग्यवंत, मयुरी सुरडकर, आचल लोखंडे, अंजली ठाले या विद्यार्थ्यांनी विठ्ठलावर आधारित कीर्तन व भजनांचे सादरीकरण केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश चव्हाण यांनी केले. विद्यार्थ्यांना संस्कृतीची ओळख व्हावी या उद्देशाने दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, अशी भावना शाळेचे मुख्याध्यापक निशांत म्हस्के यांनी व्यक्त केली. शिक्षक रमेश सोनवणे, लक्ष्मण कोलोड, नरेशसिंग राजपूत, भिकन आगारे, सुनील तांबे, रमेश परदेशी, कडूबा गिते, गणेश चव्हाण, भास्कर सागरे, अंगद काळे, अरविंद सोनवणे, अमोल ताटू, गजानन दौड, डॉ. रमेश काळे, पंकज सावंत, हर्षदा सनान्से यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *