![]()
पैठण शहर व तालुक्यातील विविध विकासकामांना गती देण्यासाठी आणि प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष आढावा बैठक पार पडली. जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार विलास भुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पैठण-आपेगाव विकास प्राधिकरण, पैठण नगर परिषद तसेच पुरातत्त्व विभागाच्या विविध प्रलंबित व सुरू असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीदरम्यान आमदार विलास भुमरे यांनी पैठण शहरातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, ड्रेनेज लाईन आणि सांडपाणी व्यवस्थापनाच्या कामांची सद्यस्थिती जाणून घेतली. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित ही कामे कोणत्याही परिस्थितीत रखडता कामा नयेत. उर्वरित सर्व कामे तातडीने व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत, अशा स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. पाणीपुरवठा योजनांची प्रगती आणि निधीच्या उपलब्धतेबाबत चर्चा झाली. नागरिकांना नियमित, पुरेसे आणि शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी योजनांची अंमलबजावणी वेगाने करण्याचे निर्देश त्यांनी दिले. पैठण नगर परिषदेच्या प्रलंबित हद्दवाढ प्रस्तावाची सद्यस्थिती आणि पुढील प्रशासकीय कार्यवाहीबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. आमदार विलास भुमरे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. आमदारांचे प्रशासनाला समन्वयाचे आदेश विभागांनी आपापसांत समन्वय राखून विकासकामांची गुणवत्ता अबाधित ठेवावी असे निर्देश आमदार भुमरे यांनी दिले. बैठकीस तहसीलदार ज्योती पवार, मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे, नगराध्यक्ष विद्या कावसानकर, उपनगराध्यक्ष तुषार पाटील, भूषण कावसानकर, विनोद बोंबले, अप्पासाहेब निर्मळ, नगरसेवक बजरंग लिंबोरे यांच्यासह अधिकारी उपस्थिती होते.
Source link
पैठणमधील विकासकामे, प्रलंबितप्रश्न मार्गी लावा- आमदार भुमरे:एसटीपी, पाणीपुरवठा, हद्दवाढ, प्राधिकरणाचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा