Headlines

सायबर पोलिसांची मोठी कारवाई:बाल लैंगिक शोषणाच्या 490 क्लिप्स बाळगणारा फार्मसीचा विद्यार्थी छत्रपती संभाजीनगरमध्ये जेरबंद; तरुण उच्चशिक्षित कुटुंबातला




बालकांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित डिजिटल सामग्री (चाइल्ड पॉर्नोग्राफी) बाळगणे आणि तिची विक्री/देवाणघेवाण करणाऱ्या विकृत साखळीविरुद्ध पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत एका खासगी मेडिकल दुकानात काम करणाऱ्या 28 वर्षीय बी. फार्मसी सुशिक्षित तरुणाला अटक करण्यात आली आहे. अक्षय प्रकाश गायकवाड (रा. साईनगर, भावसिंगपुरा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. नेमकी घटना काय? गोपनीय बातमीवरून कारवाई: राज्य महासायबर पोलिसांच्या तपासात अश्लील व्हिडिओ पाहणाऱ्या व पुढे पाठवणाऱ्या अनेक खात्यांचा सुगावा लागला होता. या माहितीच्या आधारे छत्रपती संभाजीनगरच्या सायबर पोलीस ठाण्याचे पोनि. सोमनाथ जाधव यांच्या पथकाने संशयित अक्षयला ताब्यात घेतले. आरोपीच्या मोबाईलची तपासणी केली असता, त्यात पासवर्ड प्रोटेक्टेड फोल्डरमध्ये बालकांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित तब्बल 490 हून अधिक क्लिप्स आणि डिजिटल साहित्य आढळून आले. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात अधिकृत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. उच्चशिक्षित, सुशिक्षित कुटुंबातला आरोपीने फार्मसीचे उच्च शिक्षण घेतले असून त्याचे वडील सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत, तर भाऊ वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत (डॉक्टर) आहे. बाल लैंगिक शोषणाच्या प्रकरणात याआधी यंत्रणांनी अक्षयचे गूगल, इंस्टाग्राम आणि टेलिग्राम खाते ब्लॉक केले होते. तरीही तो बनावट खात्यांद्वारे हे कृत्य करत असल्याचा दाट संशय आहे. क्लिप्सची विक्री: या प्रकारात मुख्य पुरवठादारांकडून सोशल मीडियाद्वारे प्रति क्लिप ₹400 ते ₹600 या दराने विक्री केली जात असल्याचा पोलिसांना संशय आहे. पुढील तपास आणि कायदेशीर कारवाई फॉरेन्सिक तपास: पोलीस आता फॉरेन्सिक टीमच्या मदतीने आरोपीच्या मोबाईलमधील डिलीट केलेला सर्व डेटा रिकव्हर करणार आहेत. ही सामग्री कुणाकडून विकत घेतली आणि कुणाला पाठवली, याचा शोध घेऊन त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोनि. सोमनाथ जाधव यांनी स्पष्ट केले. कायद्यातील तरतुदी (चाइल्ड पॉर्नोग्राफी हा गंभीर गुन्हा) IT ॲक्ट कलम 67-बी: बाल लैंगिक शोषणाशी संबंधित साहित्य प्रकाशित करणे किंवा तयार करणे गुन्हा आहे. यामध्ये 5 ते 7 वर्षांचा तुरुंगवास आणि 10 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. पोक्सो ॲक्ट (कलम 14 व 14-1): पोर्नोग्राफिक हेतूसाठी लहान मुलांचा वापर केल्यास किमान 5 वर्षे तर दुसऱ्यांदा दोषी आढळल्यास 7 वर्षांपेक्षा जास्त तुरुंगवास आणि दंडाची तरतूद आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *