![]()
‘शेवटची भेट. रेल्वे स्टेशनसमोरील वेदांतनगर पोलिस ठाण्याच्या समोरील लॉज, रूम नंबर सहा…’ असा संदेश आणि गळफासाचा फोटो व्हॉट्सॲप स्टेटसवर ठेवून एका ५१ वर्षांच्या सामाजिक कार्यकर्त्याने लॉजमध्ये गळफास घेत जीवनयात्रा संपवली. मंगळवारी (४ ऑगस्ट) दुपारी तीनच्या सुमारास वेदांतनगर ठाण्यासमोरील मनस्वी लॉजमध्ये हा प्रकार घडला. प्रशांत कचरू साठे (५१, रा. प्रतापनगर, छत्रपती संभाजीनगर) असे या मृत कार्यकर्त्याचे नाव आहे. महागडे शिक्षण, ‘आरटीई’मधील गैरव्यवहार आणि सरकारी धोरणांना कंटाळून तसेच मानसिक आजारामुळे आत्महत्या करत असल्याचे त्यांनी सुसाइड नोटमध्ये नमूद केले आहे. प्रशांत साठे हे सामाजिक चळवळीत सक्रिय होते. ते आरटीई पालक संघाचे अध्यक्ष होते. आरटीईसंदर्भात त्यांनी आंदोलनेही केली होती. विद्यार्थिदशेत त्यांनी एसएफआय या संघटनेतही काम केले होते. मंगळवारी दुपारी घरून निघतानाच त्यांनी सोबत दोरी घेतली होती. रेल्वे स्टेशन परिसरातील ‘मनस्वी लॉज’मध्ये त्यांनी रूम बुक केली. आत गेल्यानंतर दुपारी २:२२ वाजता त्यांनी स्वतःच्या मोबाइलवर गळफासाच्या चित्रासह आत्महत्येचे स्टेटस ठेवले. व्हॉट्सॲप स्टेटस आणि सुसाइड नोटचे फोटो पाहिल्यानंतर त्यांच्या मित्र, नातेवाइकांनी तातडीने वेदांतनगर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र दुपारी साडेतीनच्या सुमारास प्रशांत साठे यांनी गळफास घेतल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि आई-वडील असा परिवार आहे. मागील ४-५ वर्षांपासून त्यांच्यावर मानसिक आजाराचे उपचार सुरू होते, अशी माहिती समोर आली आहे. मुलाला शेवटचा फोन आत्महत्येपूर्वी दुपारी २ वाजून १४ मिनिटांनी प्रशांत यांनी त्यांचा मुलगा यशला शेवटचा कॉल केला. या वेळी त्यांनी मुलाला “यश, तू आजी, आई आणि बहिणीची काळजी घे. मन लावून अभ्यास कर, शिक्षण घेऊन मोठा हो आणि संपूर्ण कुटुंबाला सांभाळ,’ असे सांगितले. महागडे शिक्षण, आरटीईमधील गैरव्यवहार, मानसिक आजाराचा सुसाइड नोटमध्ये उल्लेख
Source link
‘शेवटची भेट, स्टेशनसमोरील लॉज, रूम नंबर 6,’स्टेटस ठेवून कार्यकर्त्याची आत्महत्या:सामाजिक कार्यकर्ते प्रशांत साठे यांनी संपवली जीवनयात्रा