Headlines

कजगावच्या चमकवाडीत पर्यावरण संवर्धनाचा संदेश:महाजन कुटुंबाची बांधिलकी; जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना रेनकोट वाटपासह वृक्षारोपण‎



दिवंगत मुलाच्या स्मृती जपण्याचा सर्वात सुंदर मार्ग म्हणजे समाजोपयोगी कार्य, याची प्रचिती भडगाव तालुक्यातील कजगाव येथील चमकवाडी जिल्हा परिषद वस्ती शाळेवर आली. दुर्गेश भानुदास महाजन यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त चमकवाडी जि. प. वस्तीशाळेत विद्यार्थ्य

.

कजगावचे माजी उपसरपंच भानुदास हिलाल महाजन यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने हा उपक्रम राबवून दिवंगत पुत्राला सामाजिक कार्यातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. पावसाळ्यात विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे शाळेत ये-जा करता यावी, यासाठी दर्जेदार रेनकोटचे वाटप करण्यात आले. तसेच शाळा परिसरात विविध वृक्षांची लागवड करून पर्यावरण संरक्षणाची सामूहिक शपथ घेण्यात आली. उपस्थितांनी दिवंगत दुर्गेश महाजन यांच्या स्मृतीस अभिवादन करून महाजन कुटुंबाच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार मुख्याध्यापक वसंत पाटील यांनी मानले. त्यांनी शाळेच्या विकासासाठी समाजाच्या सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले. सूत्रसंचालन सुनील महाजन यांनी केले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षण, स्वच्छता, वृक्षसंवर्धन व सामाजिक उत्तरदायित्वाविषयी मोलाचे मार्गदर्शन करत प्रत्येकाने एक झाड लावून ते जगवण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सादिक गणी मन्यार होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार प्रमोद लालवाणी, सरपंच विजय गायकवाड, पत्रकार बी.बी. भोसले, निलेश महाले, दीपक अमृतकर, अमीन पिंजारी, समाधान पाटील, आशुतोष पाटील, श्रेयश कासार, नितीन पाटील व माजी उपसरपंच शिवप्रसाद भालेराव ज्येष्ठ नागरिक बालू सोनवणे, एकनाथ भोई, अनिल चौधरी, सोपान महाजन यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *