![]()
तहसील कार्यालयाच्या आवारातील शासकीय जागेवर उभारण्यात आलेले मुद्राक निवारा शेडवरून वाद तीव्र झाला आहे. एका बाजूला रिपब्लिकन सेनेने हे बांधकाम विनापरवाना असल्याचा दावा करत ते हटविण्याची मागणी केली आहे, तर दुसऱ्या बाजूला सर्व मुद्रांक विक्रेत्यांनी निवारा शेड कायम ठेवण्याची मागणी केली आहे. रिपब्लिकन सेनेचे प्रवक्ता प्रा. अमोल बच्छाव यांनी तहसील आवारातील शासकीय जागेवर मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक कक्षासाठी उभारण्यात आलेले बांधकाम प्राधिकरणाची पूर्वपरवानगी व शासनासोबत भाडेकरार नसताना उभारण्यात आले आहे. त्यामुळे या बांधकामाची चौकशी करून ते हटवावे व संबंधित जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. दोन आठवड्यांच्या आत प्रशासनाने कारवाई न केल्यास १५ ऑगस्टपासून तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. तर दुसरीकडे शासकीय मुद्रांक विक्रेत्यांनी कोरोना काळात तत्कालीन तहसीलदार जितेंद्र इंगळे यांच्या परवानगीने निवारा शेड उभारण्यात आलले असून शासकीय कामासाठी येणाऱ्या तालुक्यातील नागरिकांना या शेडचा उपयोग होतो. त्यामुळे हे निवारा शेड कायम ठेवण्याची मागणी मुद्रांक विक्रेते कैलास पगार, पोपट पगार, सुनिता बढे, सुभाष आहीरे, रंजना धोंडगे आदींसह मुद्रांक विक्रेत्यानी केली आहे. ^तहसील कार्यालयाच्या आवारातील मुद्राक विक्रेता शेडबाबत निवेदने प्राप्त झाली आहेत. याबाबत नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. – कैलास चावडे, तहसीलदार बागलाण
Source link
सटाण्यात मुद्रांक विक्रेता निवारा शेडवरून वाद:हटविण्यासाठी रिपब्लिकन सेनेचा आंदाेलनाचा इशारा, तर कायम ठेवण्याची मुद्रांक विक्रेत्यांची मागणी