Headlines

ग्रीन वसुधा वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन स्पर्धेचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रारंभ:‘ग्रीन वसुंधरे’तून नवोदय विद्यालयात उगवले हरित संकल्पाचे नवकिरण‎


.

ऑगस्ट क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर “अकोला नव्या हरित क्रांतीचा साक्षीदार’ हे ब्रिद घेऊन ‘लोकांनी, लोकांसाठी, लोकांच्या सहभागातून’ उभे राहणारे ग्रीन वसुधा अभियान खऱ्या अर्थाने लोकशाहीच्या मूल्यांना पर्यावरण संवर्धनाशी जोडणारे जनआंदोलन ठरणार आहे.

दैनिक ‘दिव्य मराठी’च्या देशभर ७५ लाख वृक्षलागवड अभियानाला प्रतिसाद देत पीएसव्ही नर्चरी, जेसीआय अकोला सिटी व असोसिएशन ऑफ रिजनल ऑइल मिलर्स ऑफ अकोला (अरोमा असोसिएशन) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ग्रीन वसुधा २०२६’ वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाचा प्रारंभ बुधवारी बाभुळगाव येथील नवोदय विद्यालय परिसरात जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आले. प्रास्ताविक भावनी शाह यांनी केले तर आभार जेसीआय सचिव अभय राठी यांनी मानले. अभियानाच्या यशस्वितेसाठी जेसीआय अकोला सिटीचे अध्यक्ष अमोल अग्रवाल, प्रकल्प संचालक डॉ. प्रिया वखारिया, डॉ. दीपक वखारिया, डॉ. संकेत वखारिया, संजय श्रावगी, नितीन भारूका, आनंद अग्रवाल, संदीप अग्रवाल, गौतम श्रावगी, सुमीत बंसल, संकल्प गजघाटे, जयेश लगड, रेवती ढोरे, ज्ञानेश्वरी बनकर, रजनी कलंत्री, पलक खंडेलवाल, डॉ. सुचिता मोहता, पायल गट्टाणी, निधी लदनिया, पूजा अग्रवाल, चंचल राठी, ॲड. वर्षा लाहोटी, अपूर्वा पडगिलवार, मेघा राठी, स्मिता डागा, ममता मुंदडा, श्वेता लाहोटी, अनोखी झुनझुनवाला, कोमल मालाणी, विशाखा धूत, मोनिका राठी, पंकज लदनिया, समीर शाह, माजी उपमहापौर निखिलेश दिवेकर, पल्लवी दिवेकर, मोहम्मद झुबेर, मोहम्मद तारीक यांच्यासह जेसीआय अकोला सिटी, पीएसव्ही नर्सरी आणि अरोमा असोसिएशनचे पदाधिकारी व स्वयंसेवक परिश्रम घेत आहेत.

उपक्रमांतर्गत सहभागी विद्यार्थी आणि शाळांना ‘ग्रीन वसुंधा’च्या वतीने मोफत रोपे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. वृक्षारोपणासह लावलेल्या झाडांचे संगोपन व संवर्धन करण्यावरही विशेष भर देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करून शहर व परिसर अधिक हिरवाईने नटवण्याचा या अभियानाचा उद्देश आहे. प्रकल्प संचालिका डॉ. प्रिया वखारिया, पीएसव्ही नर्सरी आणि प्रकल्प संचालक लक्ष्मीकांत डागा, जेसीआय अकोला सिटी व अरोमा असोसिएशन यांच्या नेतृत्वात हा उपक्रम राबवण्यात येत आहे. ईश्वर गट्टाणी, वसुधा हॉस्पिटलचे या अभियानाला सहकार्य लाभले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *