![]()
भाजप नेते आणि माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी आता राज्यपाल व्हावे, त्यासाठी आमच्या सगळ्यांचा पाठिंबा असल्याचे सूचक विधान भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी केले आहे. ते म्हणाले, रावसाहेब दानवे यांचे आता वय आता राज्यपाल होण्याचे झाले असून त्यांनी आता राज्यपाल व्हावे, त्यासाठी आमच्या सगळ्यांचा पाठिंबा आहे. ते जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीनंतर आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना बबनराव लोणीकर म्हणाले, मी विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली असली तरी राजकारणावर फार काही विश्वास ठेवू नका. मी राजकारणातून निवृत्त होणार नाही. मात्र, एकदा परभणी मतदारसंघातून खासदार व्हायची इच्छा असल्याचे देखील लोणीकरांनी यावेळी इच्छा व्यक्त केली आहे. पुढे बोलताना बबनराव लोणीकर म्हणाले, मी परभणीवर क्लेम केला आहे. 80 वर्षांचा होऊ द्या नाहीहटर 100 वर्षांचा होऊ द्या, रिटायर कोणाला व्हावे वाटते. खोतकर साहेबांच्या घरी बसल्यावर त्यांच्या चिरंजीवाने म्हटले की भाऊ तुम्ही घोषणा केली. शेवटी पोरं मोठी झाली आहेत. रिटायर होऊच वाटत नाही. प्रकाशदादा सोळंकेंनी घोषणा केली होती की ते 80 वर्षांचे आहेत. मी आता निवडणूक लढणार नाही. आमचा पुतण्या निवडणूक लढवेल. नंतर सांगितले की लोकांचा आग्रह आहे. जनतेची इच्छा आहे. पक्षाने जबाबदारी दिली तर पुन्हा मीच लढेन, असा किस्सा देखील लोणीकरांनी यावेळी सांगितला. तसेच एकदा दिवंगत अंकुशराव टोपे यांची माझी भेट झाली होती. त्यावेळी राजकारणाचा आता कंटाळा आला असे म्हणालो होतो. त्यावेळी ते म्हणाले की बबनराव घाई नका, मीच फसलो आहे. तुम्ही फसू नका. तुम्ही काय घोषणा करू नका. माझी इच्छा आहे खासदार व्हायची, मंत्री व्हायची, पण आता होता येते का? असे ते म्हणाले होते, असाही एक किस्सा लोणीकर यांनी सांगितला.
Source link
"रावसाहेब दानवेंचे वय आता राज्यपाल होण्याचे…":आम्ही पाठिंबा द्यायला तयार, आमदार बबनराव लोणीकरांचे सूचक विधान