Headlines

शहरातील पाचपैकी एक मतदार पडताळणीबाहेर!:पारनेर, कर्जत-जामखेडमध्ये 38,31 हजार नोंदी अनकलेक्टेबल ; 4.29 लाख मतदारांची पडताळणी बाकी‎



विशेष सखोल मतदारयादी पुनर्रचनेत (एसआयआर) जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघांमधील तब्बल ४ लाख २९ हजार १०८ मतदारांच्या नोंदी पडताळणीबाहेर (अनकलेक्टेबल) असल्याचे ११ ऑगस्टच्या अहवालातून समोर आले. हे प्रमाण जिल्ह्यातील एकूण मतदारांच्या ११.२६ टक्के आहे. विश

.

1) मतदार ‘पडताळणीबाहेर’ म्हणजे काय? एसआयआरमध्ये घरभेटीद्वारे मतदारांची पडताळणी केली जाते. मतदाराची माहिती निश्चित करता न आल्यास किंवा त्याची सध्याची स्थिती स्पष्ट न झाल्यास नोंद ‘पडताळणीबाहेर’ जाते. यात मृत, कायमचे स्थलांतरित, अनुपलब्ध किंवा अन्यत्र नोंदलेले मतदार असू शकतात. त्यामुळे हा आकडा म्हणजे मतदार बाद झाले, असा अर्थ नाही; ही अंतिम यादीपूर्वीची पडताळणी प्रक्रिया आहे. 2) ४.२९ लाखांचा आकडा महत्त्वाचा का? जिल्ह्यात ४ लाख २९ हजार १०८ नोंदी पडताळणीबाहेर आहेत. त्यापैकी १.७२ लाख कायमचे स्थलांतरित आणि १.४१ लाख मृत असल्याची नोंद आहे. म्हणजे ३.१३ लाख नोंदी या दोन कारणांशी संबंधित आहेत. त्यामुळे हा आकडा केवळ मतदारयादीतील बदल नव्हे, तर जिल्ह्यातील स्थलांतर आणि बदलत्या लोकसंख्येचेही संकेत देतो. 3) २५ पट आकडा काय सांगतो? पारनेर आणि कर्जत-जामखेडमध्ये २०२४ची विधानसभा निवडणूक अनुक्रमे १,५२६ आणि १,२४३ मतांनी ठरली. त्याच ठिकाणी ३८,४२८ आणि ३१, ५६३ नोंदी पडताळणीबाहेर आहेत, म्हणजे विजयाच्या फरकाच्या २५ पट. मात्र याचा थेट निवडणूक निकालाशी संबंध जोडता येणार नाही. अंतिम मतदारयादीत या नोंदींपैकी किती बदलतात, हेच खरे महत्त्वाचे ठरणार आहे. शिर्डीत पडताळणी बाहेरच्या नोंदी विजयफरकापेक्षा कमी शिर्डीमध्ये ३९,९७५ मतदारांच्या नोंदी पडताळणीबाहेर आहेत, तर २०२४च्या विधानसभा निवडणुकीतील विजयाचा फरक ७०,२८२ मतांचा होता. म्हणजे पडताळणीबाहेरच्या नोंदी या विजयफरकाच्या ०.५७ पट आहेत. कोपरगावात ३८,००९ नोंदी पडताळणीबाहेर असून विजयाचा फरक १,२४,६२४ मतांचा होता. त्यामुळे येथे पडताळणीबाहेरच्या नोंदी विजयफरकाच्या केवळ ०.३० पट आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *