![]()
आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग जिल्हा रुग्णालय, अहिल्यानगरमार्फत बुधवारी शहरात एचआयव्ही एड्स जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर रॅलीच्या मुख्य कार्यक्रमास डॉ. संतोष विधाते जिल्हा क्षयरोग अधिकारी, डॉ. सुच
.
एचआयव्ही संसर्ग रोखण्यासाठी युवकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. प्रत्येक युवकाने एचआयव्ही एड्सबाबत सविस्तर माहिती प्राप्त केल्यास भविष्यात त्यांच्यापर्यंत एचआयव्ही संसर्ग येणार नाही. त्याचप्रमाणे प्रत्येक युवकाने एचआयव्हीबाबतची माहिती इतर सहकाऱ्यांना, समाजातील व्यक्तींना दिल्यास मोठ्या प्रमाणावर जनजागृती होऊन एचआयव्हीची संसर्ग होण्यास मदत होईल. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात जाधव यांनी जिल्ह्याची एचआयव्हीबाबत सद्यस्थिती, संसर्गाचे मार्ग प्रतिबंधात्मक उपाय व युवकांची भूमिका व जिल्हा एड्स नियंत्रण विभाग यांच्यामार्फत घेत असलेले परिश्रम यांबाबतची माहिती दिली. सूत्रसंचालन नवनाथ लोखंडे यांनी तर आभार प्रदर्शन राधाकिसन पाटोळे यांनी केले.
सदर जनजागृती रॅलीमध्ये भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल, महर्षी ग. ज. चितांबर विद्यामंदिर, न्यू आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज, न्यू लॉ कॉलेज, जिल्हा नर्सिंग विद्यालय येथील विद्यार्थ्यांनी बॅनर व संदेश घोषवाक्य फलकासह सहभाग घेतला होता. रॅलीच्या सुरुवातीला न्यू आर्ट्स कॉमर्स सायन्स महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नृत्य व संगीत याद्वारे कलंक व भेदभाव संदर्भातील संदेश दिला. रॅलीचा समारोप जिल्हा आयुष्य रुग्णालय या ठिकाणी करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सागर फुलारी, रोहन भांबळ, वैशाली कुलकर्णी, सविता बेलेकर, शर्मिला मस्के, राहुल कडूस, विनय इदे, राहुल खैरनार, प्रवीण देठे, दिनेश लोंढे, तसेच स्नेहज्योत प्रकल्प व अमृतदीप प्रकल्प कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. दरम्यान, जिल्ह्यातील सर्व आयसीटीसी समुपदेशक प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांच्यामार्फत प्रत्येक तालुक्यातील महाविद्यालयांमध्ये जनजागृती पर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
रेड रिबीन क्लब असलेल्या महाविद्यालयांना आर्थिक सहाय्य करून त्यांच्यामार्फत युवकांसाठी चित्रकला, पोस्टर बनविणे, स्लोगन्स बनविणे, डिजिटल पोस्टर, रिल्स बनविणे इत्यादी स्पर्धेचे आयोजन करून त्याद्वारे एचआयव्ही एड्सबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. शहरात एचआयव्ही एड्स जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
आज शहरात रेड रन स्पर्धा आज सकाळी ७.३० वाजता रेड रिबन क्लब असलेल्या महाविद् ालयातील विद्यार्थ्यांच्या सहभागाने रेड रन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा पाच किलोमीटरची असून जिल्हा रुग्णालय प्रेमदान चौक सावेडी नाका येथून वळसा घालून परत प्रेमदान चौक मार्गे जिल्हा रुग्णालय या ठिकाणी समाप्त होणार आहे. त्याचप्रमाणे दुपारी साडेबारा वाजता आठवी, नववी, अकरावी विद्यार्थ्यांकरीता एचआयव्ही एड्स, मानसिक आरोग्य, युवकांमधील व्यसनाधिनता व आरोग्य या विषयावर प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.