Headlines

तुकाराम मुंढेंचा मोठा दणका:मुंबईसह राज्यभरात डॉमिनोज पिझ्झाचे 5 परवाने निलंबित; गोंदियातील 4 आयुर्वेदिक कंपन्यांवरही कारवाई




अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेबाबत कडक मोहीम राबवली जात आहे. आता एफडीएने आपला मोर्चा थेट मोठ्या आणि आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड्सकडे वळवला असून, अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ‘डॉमिनोज् पिझ्झा’च्या मुंबईसह राज्यभरातील 5 आउटलेटचे अन्न व्यवसाय परवाने रद्द (निलंबित) केले आहेत. यासोबतच गोंदिया जिल्ह्यातील 4 आयुर्वेदिक औषध कंपन्यांचे परवानेही कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. डॉमिनोज् पिझ्झावरील कारवाईची कारणे आणि ठिकाणे मुंबई आणि सातारा जिल्ह्यातील डॉमिनोज् पिझ्झाच्या आऊटलेट्समध्ये एफडीएच्या पथकाने अचानक तपासणी केली. यात अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या, ज्यामुळे ५ परवाने निलंबित करण्यात आले आहेत. विलेपार्ले (मुंबई) आउटलेटमधील त्रुटी: ग्राहकांना दिसावा यासाठी ‘FSSAI’ परवाना प्रदर्शित केलेला नव्हता. पिण्याच्या पाण्याच्या तपासणीच्या कोणत्याही नोंदी उपलब्ध नव्हत्या. अन्न साठवणूक, स्वच्छता आणि कीटक नियंत्रण सुविधांमध्ये मोठ्या त्रुटी आढळल्या. अन्नपदार्थ साठवण्यासाठी आवश्यक असणारे तापमान नियंत्रण आणि तपासणीची योग्य व्यवस्था नव्हती. आर-सिटी मॉल, घाटकोपर (मुंबई) आउटलेटमधील त्रुटी: कीटक नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना आणि त्यांच्या नोंदी नव्हत्या. अन्न साठवणूक, तापमान नियंत्रण आणि स्वच्छतेचे निकष पूर्ण केलेले नव्हते. खाद्यपदार्थांच्या संपर्कात येणाऱ्या साहित्याची प्रमाणपत्रे उपलब्ध नव्हती. कर्मचाऱ्यांच्या स्वच्छता आणि वैद्यकीय तपासणीच्या नोंदी ठेवलेल्या नव्हत्या. अन्न आणि पाण्याच्या चाचणीचे अहवाल सादर करण्यात आउटलेट अपयशी ठरले. बोरिवली (मुंबई): येथील आउटलेटमध्येही अन्न साठवणूक, तापमान नियंत्रण, स्वच्छता आणि खाद्यपदार्थ हाताळणीच्या नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे समोर आले. सातारा जिल्हा: मुंबईव्यतिरिक्त सातारा जिल्ह्यातील कराड आणि मलकापूर येथील डॉमिनोज् पिझ्झाच्या आउटलेटचे परवानेही रद्द करण्यात आले आहेत. गोंदियातील 4 आयुर्वेदिक औषध कंपन्यांचे परवाने कायमचे रद्द तुकाराम मुंढे यांच्याच मार्गदर्शनाखाली मे, जून व जुलै 2026 दरम्यान गोंदिया जिल्ह्यातील पाच आयुर्वेदिक औषध उत्पादक कंपन्यांची कसून तपासणी करण्यात आली. यापैकी चार कंपन्यांमध्ये औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा 1940 (नियम 1945, परिशिष्ट-‘टी’) मधील तरतुदींचे अत्यंत गंभीर उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाले. कायमस्वरूपी परवाने रद्द झालेल्या कंपन्या: याशिवाय गोंदियाच्या रेलटोली येथील ‘पाठक आयुर्वेदिक फार्मसी’ला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, त्यांच्यावरील कारवाई अद्याप सुरू आहे. कारवाईपूर्वी या कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून लेखी खुलासे मागवण्यात आले होते. मात्र, त्यांच्या स्पष्टीकरणावर एफडीएचे समाधान झाले नाही. आढळून आलेल्या त्रुटी अत्यंत गंभीर स्वरूपाच्या असून, त्यामुळे तयार होणाऱ्या औषधांची गुणवत्ता, सुरक्षितता आणि परिणामकारकतेवर थेट विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जनआरोग्याच्या हितासाठी या चारही कंपन्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याचा कठोर निर्णय प्रशासनाने घेतला आहे. हेही वाचा… शाळा-रुग्णालयांच्या अधिकृत बायोमेट्रिक मशीनचा गैरवापर:बनावट कागदपत्रांच्या आधारे आधार अपडेट करणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड, 4 जण अटकेत कांदिवली, वडाळा, मिरा-भायंदर आणि समतानगर परिसरात बनावट कागदपत्रांच्या आधारे आधार अपडेट करणे, बँक पॉलिसीची बनावट कागदपत्रे आणि बोगस शासकीय प्रमाणपत्रे बनवणाऱ्या अट्टल रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी अन्वर शेख (रा. मिरा-भायंदर), अमित ऊर्फ सोनू शर्मा (रा. कांदिवली-पोयसर), विकास उतेकर (रा. वडाळा) आणि राजेश गुप्ता (रा. समतानगर, कांदिवली) या चार आरोपींना अटक केली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *