![]()
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था, वाहतूक, रस्ते, वीजपुरवठा आणि स्वच्छतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करुन वेळेत उपाययोजना करण्याचे निर्देश अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांनी प्रशासनाला िदले. क
.
शहरातील रस्त्यांची दुरवस्था, बंद पथदिवे, वीजपुरवठा, मिरवणुकांच्या वेळी वाहतूक नियोजन, स्वच्छता आणि कावड, अकोट-धारगड यात्रेच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी बैठक झाली. गांधीग्राम ते अकोट फैल मार्गावरील पथदिवे बंद असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. संबंधित यंत्रणेने पथदिवे तातडीने सुरू करावेत, असे निर्देश देण्यात आले. सणांच्या काळात मिरवणुका आणि जुलूसामुळे प्रमुख मार्गांवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिरवणूक मार्ग निश्चित करून त्यानुसार वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्याचे नियोजन करावे, असेही सांगितले.
स्वच्छता व्यवस्थेवर नाराजी शहरातील अस्वच्छतेच्या प्रश्नावर आ. पठाण यांनी नाराजी व्यक्त केली. सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर केवळ काही दिवस स्वच्छता मोहीम राबविण्याऐवजी शहराची नियमित आणि प्रभावी स्वच्छता व्यवस्था कायम ठेवावी, असे निर्देश त्यांनी महापालिका प्रशासनाला दिले.