ज्या ज्या लोकांनी आवाज उठवला त्यांना काही लोकांनी फोन करत तुम्ही आवाज का उठवत आहात, तुम्हाला अडचण येऊ शकते, धंद्याला अडचणी येऊ शकतात, काही लोकांना धमक्या दिल्या गेल्याचे कळते आहे, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. तर ज्या 20 लोकांनी काल आवाज
.
रोहित पवार म्हणाले की, एमआयडीसीचे रस्ते अत्यंत खराब आहे, त्यामुळे अपघात होतात, वेळ जास्त लागतो, वाहनं खराब होतात, लोकं वेळेवर पोहचत नाही. बाहरेच्या कंपन्या जर इथे येत अशी परिस्थिती बघणार असतील तर ते बाहेर राज्यात जाण्याचाच विचार करतील. काही कंपन्या बंद झाल्याने त्यांच्या रोजगारांचा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारवर दबाव आला तर सरकार काम करते त्यामुळे सर्व उद्योजकांनी एकत्र येत दबाव निर्माण केला पाहिजे, आम्ही तुमच्यासोबत आहोत.

नागरिकांना सतत मनस्ताप सहन करावा लागतोय
रोहित पवार म्हणाले की, गेली दोन तास प्रवास करूनही एमआयडीसीच्या मुख्य भागापर्यंत पोहोचता आले नाही, यावरून एमआयडीसीतील वाहतूक आणि रस्त्यांच्या वाईट स्थितीची तीव्रता समोर येते. कोणत्याही भागाच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासासाठी एमआयडीसी अत्यंत महत्त्वाच्या असतात; मात्र अशा भीषण परिस्थितीमुळे उद्योजक आणि नागरिकांना सतत मनस्ताप सहन करावा लागत आहे.
चाकण औद्योगिक क्षेत्रात एमआयडीसी सीईओ, जिल्हाधिकाऱ्यांची पाहणी
दुसरीकडे एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाहा आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी चाकण औद्योगिक क्षेत्राची पाहणी केली. औद्योगिक क्षेत्रातील रस्ते आणि वाहतूक सुविधांच्या प्रलंबित कामांना गती देण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. या पाहणीदरम्यान, चाकण औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती आणि अपूर्ण काँक्रिटीकरणाची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी कुशवाहा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. कामे करताना वाहतूक विस्कळीत होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांशी समन्वय साधण्याचेही त्यांनी सांगितले.
उद्योग क्षेत्राच्या सुरळीत कामकाजासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांबाबत प्राप्त झालेल्या सूचनांची संबंधित विभागांच्या माध्यमातून दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाहा आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले. हे ही वृत्त वाचा
चाकणमधील एकही उद्योग बाहेर जाऊ देणार नाही:उद्योजकांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन सकारात्मक- उद्योगमंत्री उदय सामंत

चाकण औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे काही कंपन्या महाराष्ट्राबाहेर किंवा राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये स्थलांतरित होण्याच्या तयारीत आहेत. या पार्श्वभूमीवर, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी 16 ऑगस्ट रोजी चाकण येथे प्रत्यक्ष बैठक घेण्याची घोषणा केली आहे. वाचा सविस्तर चाकण एमआयडीसीतील दुरवस्थेमुळे 20 लघुउद्योग स्थलांतराच्या तयारीत:2 हजार कोटींची उलाढाल अन् हजारो रोजगार धोक्यात

पुणे येथील चाकण औद्योगिक वसाहतीतील खराब रस्ते, वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे लघु व मध्यम उद्योगांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. या समस्यांमुळे सुमारे 20 लघुउद्योग स्थलांतराच्या तयारीत असून, यामुळे 2 हजार कोटी रुपयांची उलाढाल आणि हजारो रोजगार धोक्यात येण्याची शक्यता आहे. उद्योजकांनी यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. वाचा सविस्तर
5 वर्षांत 36 हजार कंपन्या बंदचा मुद्दा तापला:पवारांच्या टीकेला CM फडणवीसांचे आकडेवारीसह प्रत्युत्तर- 76 टक्के कंपन्या कधी सुरूच झाल्या नव्हत्या!

पुण्यातील चाकण औद्योगिक वसाहतीतून 20 कंपन्यांचे स्थलांतर आणि राज्यात गेल्या 5 वर्षांत 36 हजारांहून अधिक कंपन्या बंद पडल्याच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी याच मुद्द्यावरून राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. यावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना ‘X’ (ट्विटर) वरूनच अत्यंत सविस्तर आणि आकडेवारीसह सडेतोड उत्तर दिले आहे.
प्रकरण नेमकं काय आहे?
नुकत्याच संपलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात खासदार राजाभाऊ वाजे यांनी विचारलेल्या प्रश्नावर केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्र्यांनी उत्तर दिले होते. त्यानुसार, गेल्या 5 वर्षांत महाराष्ट्रातील तब्बल 36,211 खासगी कंपन्या बंद पडल्याची माहिती समोर आली. याच आकडेवारीचा आणि चाकण एमआयडीसीतून मूलभूत सुविधांच्या अभावामुळे 20 कंपन्या स्थलांतरित होत असल्याचा संदर्भ देत, शरद पवार यांनी राज्य सरकारला धारेवर धरले होते. ‘हा यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र असून उद्योगांचे असे स्थलांतर होणे राज्याला भूषणावह नाही,’ अशी टीका पवारांनी केली होती. वाचा सविस्तर