Headlines

दिल्लीत राजकीय हालचालींना वेग:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; विकास प्रकल्पांसह संघटनात्मक फेरबदलांवर खलबतं




महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा व महत्त्वपूर्ण भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी महाराष्ट्रातील विविध पायाभूत विकास प्रकल्पांची सद्य:स्थिती, केंद्र सरकारच्या समन्वयातून राबवल्या जाणाऱ्या योजना आणि राज्यासाठी आवश्यक असलेल्या केंद्रीय सहकार्याबाबत पंतप्रधान मोदींशी सविस्तर चर्चा केली. स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत या भेटीची माहिती दिली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपला पुण्यातील पूर्वनियोजित दौरा अर्धवट सोडून तातडीने दिल्ली गाठल्याने आणि ही उच्चस्तरीय बैठक पार पडल्याने राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चांना उधाण आले आहे. विकास प्रकल्पांचा आढावा आणि केंद्राचे सहकार्य या बैठकीत राज्यातील प्रलंबित व सुरू असणाऱ्या महत्त्वाच्या प्रकल्पांवर चर्चा झाली. राज्यातील मेट्रो मार्गिकांचे जाळे, रेल्वेचे प्रकल्प, महामार्ग आणि सिंचन योजनांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. केंद्राच्या विविध योजना राज्यात अधिक प्रभावीपणे आणि वेगाने राबवण्यासाठी केंद्र सरकारकडून अतिरिक्त निधी व प्रशासकीय सहकार्य मागण्यात आले. पाहा या भेटीचे फोटोज… भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी आणि महाराष्ट्रातील चेहरे प्रशासकीय कामकाजाव्यतिरिक्त या भेटीला मोठी राजकीय व संघटनात्मक पार्श्वभूमी असल्याचे मानले जात आहे. भाजपच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीनंतर पक्षाची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी आणि केंद्रीय टीम लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातील काही प्रमुख नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता असून, त्यासंदर्भात पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याचे समजते. केंद्रीय व राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध आगामी काळातील राजकीय घडामोडींच्या दृष्टीने या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावरही खलबतं झाल्याची चर्चा आहे: केंद्रात संभाव्य फेरबदलांमध्ये महाराष्ट्रातील कोणत्या खासदारांचा समावेश केला जाऊ शकतो, यावर प्राथमिक चर्चा झाल्याचे वृत्त आहे. आगामी काळात राज्यातही मंत्रिमंडळ विस्तार किंवा संघटनात्मक समन्वय साधण्याच्या दृष्टीने विद्यमान मंत्र्यांची कामगिरी (Performance) आणि नव्या आमदारांना संधी देण्याबाबत व्यूहरचना आखली जात असल्याचे संकेत मिळत आहेत. पंतप्रधानांची भेट नेहमीच नवी ऊर्जा देणारी – मुख्यमंत्री फडणवीस पंतप्रधानांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या पोस्टमध्ये ते म्हणाले, “देशाचे यशस्वी पंतप्रधान आणि भारताचे वैश्विक नेतृत्व मा. नरेंद्र मोदीजी यांची आज नवी दिल्ली येथे भेट घेतली आणि विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. महाराष्ट्रातील विविध विकास प्रकल्पांची सविस्तर माहिती त्यांना दिली आणि केंद्र सरकारशी समन्वयातून राबविल्या जात असलेल्या योजना, प्रकल्पांबाबत सहकार्यही मागितले. नेहमीप्रमाणेच त्यांची भेट एक नवी ऊर्जा देणारी असते. त्यांचे विकासाच्या प्रश्नांवर बहुमूल्य मार्गदर्शन आणि महाराष्ट्राला भक्कम पाठिंबा, यासाठी मी त्यांचा नितांत आभारी आहे!” राज्यातील प्रशासकीय प्रकल्पांना गती मिळण्यासोबतच, भाजपच्या राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील आगामी राजकीय रणनीतीच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा दिल्ली दौरा अत्यंत कळीचा ठरण्याची चिन्हे आहेत. हेही वाचा… अखेर पालकमंत्रिपदे जाहीर: रायगडची धुरा भरत गोगावलेंकडे, तर नाशिकमध्ये गिरीश महाजनांची वर्णी; महायुतीतील ‘पॉवर गेम’चा तिढा सुटला राज्यात महायुती सरकारची स्थापना झाल्यापासून सर्वाधिक चर्चेत असलेला आणि मित्रपक्षांमध्ये प्रतिष्ठेचा बनलेला रायगड व नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदांचा तिढा अखेर सुटला आहे. अनेक महिन्यांच्या राजकीय रस्सीखेचीनंतर रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार भरत गोगावले यांची, तर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांची अधिकृत वर्णी लागली आहे. महायुतीतील पॉवर गेमच्या पार्श्वभूमीवर घेतलेला हा निर्णय अंतर्गत धुसफूस थांबवण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदासाठी महायुतीतील शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तिन्ही पक्षांमध्ये मोठी राजकीय ओढाताण सुरू होती. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *