राज्यातील महसूल अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. गेल्या दीड वर्षांत सुमारे 950 अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली असून, त्यांना पूर्ण अधिकार देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. गेल्या 20 वर्षांपासून थांबलेल्या सर्व पदोन्नत्या मार्गी लावण
.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आदर्श घोटाळ्यानंतर महसूल विभागाच्या जागेवर गृहनिर्माण सोसायट्या स्थापन करण्यासाठी कोणतेही स्पष्ट धोरण अस्तित्वात नव्हते, असा उल्लेख करत बावनकुळे म्हणाले, यासंदर्भात कालच एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. लवकरच राज्य शासन यावर नवीन धोरण जाहीर करणार आहे. यामुळे नागरिकांना वाजवी दरात घरे मिळणे शक्य होईल आणि राज्यातील सुमारे 70 हजार सोसायट्यांचा प्रलंबित प्रश्न सुटेल. ‘सर्वांसाठी घरे’ ही योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी आमचे विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत.

“त्या” जमीनी पुन्हा घेण्याचा विचार
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, जे साखर कारखाने बंद पडले आहेत, त्यांच्या ताब्यातील महसूल विभागाच्या अतिरिक्त जमिनींबाबतही आढावा घेतला जात आहे. ज्या कारखान्यांना महसूल खात्याने जमिनी दिल्या होत्या, परंतु तेथील उद्योग बंद पडले आहेत, अशा जागांवर काही नवीन उपक्रम सुरू करता येतील का, यावर विचार सुरू आहे. शासनाच्या अशा जमिनींचा योग्य आणि नवीन कामांसाठी वापर कसा करता येईल, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
शिवसेनेवर कोर्ट योग्य निर्णय घेईल
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, शिवसेनेची कायदेशीर लढाई सर्वोच्च न्यायालयात सुरू असून न्यायालय त्याबाबत योग्य तो निर्णय देईल. त्यावर मी भाष्य करणे योग्य ठरणार नाही. राजस्थानमधील 10 मनपाची माझ्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. मी या सर्व ठिकाणी प्रवास करणार आहे. राजस्थानसाठी आम्ही टीम तयार केली असून तिथल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही ती निवडणूक जिंकणार आहोत.
हे ही वृत्त वाचा नागपुरात ‘लव्ह ट्रँगल’मधून कुख्यात गुन्हेगाराचा निर्घृण खून:चाकू अन् कुऱ्हाडीने वार करणाऱ्या आरोपीला अटक, पोलिसांकडून तपास सुरू

नागपुरातील नरेंद्र नगर येथील सुंदरबन परिसरात ‘लव्ह ट्रँगल’मधून निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान एका कुख्यात गुन्हेगाराच्या निर्घृण हत्येत झाले आहे. अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेला गौरव रगडे (35) याच्यावर त्याच्याच मित्राने चाकू आणि कुऱ्हाडीने हल्ला करून त्याची हत्या केली. अर्धा तास रस्त्यावर सुरू असलेल्या जीवघेण्या धुमश्चक्रीनंतर पोलिसांनी मयताचा मित्र व मुख्य आरोपी गौरव प्रभाकर राऊत याला घटनास्थळावरूनच ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दीपक वासनिक यालाही सह-आरोपी केले आहे. वाचा सविस्तर