![]()
सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथे संत सेवालाल महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी २ कोटी रुपयांचा विकासनिधी देणार असल्याची घोषणा राज्याचे बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केली. फर्दापूर येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि भाजप कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आमदार सुहास शिरसाट व राज्यमंत्री दर्जा प्राप्त इद्रिस मुलतानी यांची उपस्थिती होती. मंत्री सावे पुढे म्हणाले की, फर्दापूर जिल्हा परिषद गटातील विकासकामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही. बंजारा समाजाची अनेक दिवसांपासूनची मागणी लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून बंजारा तांडा वस्ती निधीतून २ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच इद्रिस मुलतानी यांनी सहा महिन्यांत केलेल्या विकासकामांचे त्यांनी कौतुक केले. यावेळी इद्रिस मुलतानी यांनी विरोधी आमदारांवर टीका करत, मंजूर केलेल्या कामांचे खोटे श्रेय घेण्यापेक्षा पुरावे सादर करण्याचे आव्हान दिले. या सोहळ्यास जि.प. उपाध्यक्ष जितेंद्र जयस्वाल, माजी आमदार सांडू पाटील लोखंडे, सुरेश बनकर, किशोर आबा पवार, ज्ञानेश्वर मोठे, सुनील मिरकर, माहीन मुलतानी, पुष्पा काळे, सचिन वाघ, राधाकृष्ण काकडे, विकास कापसे, सभापती उत्तम चव्हाण, तालुकाध्यक्ष संजय पाटील, उपसभापती भगवान आहेर, तसेच दिलीप दानेकर, सुनील गवंडे, जयप्रकाश चव्हाण, शिवाजी बुडाळ, गणेश लोखंडे, राजेंद्र जावळे, अनिल खरात, आत्माराम पाडळे, एकनाथ हिवाळे, स्वप्निल शिनगारे, गणेश भूमकर, अरुण काळे, मेघराज चोंडीये आदी उपस्थित होते. फर्दापूर-सावळदबारा विद्युत लाइनसाठी ८ कोटी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर ते जळगाव व बुलढाणा हायवे, ३३ केव्ही सबस्टेशन आणि धरणांच्या कामांचा उल्लेख केला. तर राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी दूरध्वनीवरून संवाद साधत फर्दापूर-सावळदबारा विद्युत लाईनसाठी ८ कोटी, ७७ नवीन डीपी आणि पाणीपुरवठा योजनेसाठी ५० लाखांचा निधी दिल्याचे सांगितले.
Source link
फर्दापूर येथे संत सेवालाल महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार:बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांची 2 कोटींच्या निधीची घोषणा