![]()
महाराष्ट्रातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या ‘स्पेशल इन्टेन्सिव रिव्हिजन’ (SIR) अंतर्गत प्रारूप मतदार यादीतून (Draft Voter Roll) राज्यातील तब्बल 2 कोटी 7 लाख मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे तुमचे नाव अद्याप मतदार यादीत कायम आहे की नाही, हे वेळीच तपासून पाहणे आता अत्यंत गरजेचे झाले आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशाची राजधानी दिल्लीतही हाच पॅटर्न पाहायला मिळाला असून तिथल्या एकूण 1 कोटी 45 लाख मतदारांपैकी सुमारे 47 लाख 56 हजार 722 मतदारांची नावे या यादीतून बाहेर पडली आहेत. दिल्लीत सध्या केवळ 97 लाख 53 हजार 507 मतदारांचा रेकॉर्ड डिजिटाईज होऊ शकला आहे. नाव वगळण्यामागचे मुख्य कारण काय? निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, मतदार यादीच्या अद्ययावतीकरणासाठी घरोघरी जाऊन करण्यात आलेली पडताळणी, डिजिटायझेशनसाठी आवश्यक असलेले फॉर्म जमा न होणे आणि इतर काही तांत्रिक कारणांमुळे ही मोठी कपात झाली आहे. प्रामुख्याने खालील कारणांमुळे नावे वगळण्यात आली आहेत: काळजी नको, मतदानाचा अधिकार अजूनही सुरक्षित! जर तुमचे नाव या प्रारूप यादीत नसेल, तर घाबरून जाण्याचे अजिबात कारण नाही. तुमचा मतदानाचा हक्क अद्याप संपलेला नाही. निवडणूक आयोगाने नागरिकांना त्यांचे नाव पुन्हा समाविष्ट करण्यासाठी 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2026 पर्यंतची मुदत दिली आहे. या 1 महिन्याच्या कालावधीत नागरिक आपले दावे आणि हरकती नोंदवू शकतात. या सर्व अर्जांचा निपटारा 29 ऑक्टोबर 2026 पर्यंत केला जाईल आणि 4 नोव्हेंबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. यादीत नाव कसे तपासावे आणि काय करावे? 1. नाव कसे तपासावे?सर्वात आधी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या (CEO) अधिकृत संकेतस्थळावर किंवा निवडणूक आयोगाच्या voters.eci.gov.in या पोर्टलला भेट देऊन ड्राफ्ट रोलमध्ये तुमचे नाव आहे की नाही, याची खात्री करा. 2. नाव गायब असल्यास (फॉर्म 6):जर तुमचे नाव यादीत नसेल, तर 30 सप्टेंबर 2026 पूर्वी फॉर्म नंबर 6 भरून, आवश्यक कागदपत्रांसह आपले नाव पुन्हा जोडण्यासाठी दावा सादर करा. 3. आक्षेप नोंदवण्यासाठी (फॉर्म 7):एखाद्या अपात्र किंवा मृत व्यक्तीचे नाव चुकून यादीत आले असल्यास, त्यावर आक्षेप घेण्यासाठी फॉर्म नंबर 7 चा वापर करा. 4. दुरुस्ती किंवा पत्ता बदलण्यासाठी (फॉर्म 8):मतदार ओळखपत्रातील (EPIC) नावाचे स्पेलिंग दुरुस्त करणे, पत्ता बदलणे किंवा इतर सुधारणांसाठी फॉर्म नंबर 8 भरावा लागेल. लोकशाहीतील आपला सर्वात मोठा अधिकार बजावण्यासाठी 30 सप्टेंबरपूर्वी आपली नोंदणी तपासून घ्या आणि अंतिम यादीत आपले नाव निश्चित करा. तुमचे नाव तपासण्यासाठीच्या पाच पायऱ्या यादीत नाव नसल्यास हे 14 पुरावे आवश्यक (ही बातमी अपडेट होत आहे…)
Source link
मतदार यादीचा नवा ड्राफ्ट जारी:'SIR' अंतर्गत महाराष्ट्रातील 2 कोटींहून अधिक मतदारांची नावे कट, तुमचे नाव आहे का? घ्या जाणून…