Headlines

छत्रपती संभाजीनगरात आजपासून हेल्मेट बंधनकारक:पोलिस ठाणे निहाय तपासणी, हेल्मेट नसल्यास 1000 हजार रुपये दंड




राज्यभरात अपघाती मृत्यूंची संख्या 10 टक्क्यांनी कमी करण्याचे निर्देश पोलिस महासंचालक कार्यालयाने दिले आहेत. त्यानुसार मागील 3 महिन्यांपासून शहर पोलिस दल कार्यरत आहे. आता 1 सप्टेंबरपासून वाहनधारकांसाठी हेल्मेट सक्ती अधिक तीव्र करण्यात येत आहे. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी जून महिन्यात सर्वप्रथम पोलिस कर्मचाऱ्यांना आणि नंतर शासकीय कार्यालयांत हेल्मेट बंधनकारक केले होते. या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात आता सामान्य नागरिकांवर कायदेशीर बडगा उगारण्यात येत आहे. शहरातील वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी आणि रस्ते सुरक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी आता स्थानिक पोलिस ठाण्यांनाही जबाबदारी देण्यात आली आहे. यापुढे संबंधित पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रमुख चौक आणि रस्त्यांवर विनाहेल्मेट वाहन चालवणाऱ्यांवर त्या-त्या ठाण्यातील पथकाकडून संयुक्तपणे तपासणी आणि दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त कार्यालयाने दिली आहे. नागरिकांनी स्वत:हून सुरक्षेला प्राधान्य देत हेल्मेट वापरावे काय आहे कायदा? मोटार वाहन कायदा, 1988 च्या कलम 129 नुसार दुचाकी चालक आणि पाठीमागे बसणाऱ्या दोघांनाही हेल्मेट घालणे सक्तीचे आहे. नियम न पाळल्यास, मोटार वाहन कायदा (सुधारणा) 2019 च्या कलम 194 (ड) नुसार 1000 रुपयांचा दंड आणि 3 महिन्यांसाठी परवाना (लायसन्स) रद्द करण्याची कायदेशीर तरतूद आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *