![]()
बाहेरगावाहून बसस्थानकावर उतरल्यानंतर रिक्षाने घरी जाण्यासाठी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक चौकात आलेल्या तरुणीची छेड काढल्याच्या संशयावरून एका ३८ वर्षांच्या तरुणाला जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी (१८ एप्रिल) मध्यरात्री घडली. या मारहाणीत तरुण जखमी झाला असून, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र, हा प्रकार केवळ गैरसमजातून झाल्याने दोन्ही पक्षांनी तक्रार देण्यास नकार दिला आहे शहरात राहणारी ही तरुणी रात्री उशिरा गावाहून आली होती. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक चौकात ती रिक्षाची वाट पाहत असताना रिक्षात बसताना एका तरुणाचा तिला धक्का लागला. यावरून वाद होऊन परिसरात आरडाओरड झाली. तरुणीची छेड काढली जात असल्याचे समजून जमलेल्या जमावाने त्या तरुणाला चोप दिला. माहिती मिळताच एमआयडीसी सिडको पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी जखमी तरुणाला घाटी रुग्णालयात पाठवले, तर तरुणीला पोलिस ठाण्यात नेले.
Source link
वसंतराव नाईक चौकात तरुणीच्या छेडीच्या संशयावरून तरुणाला जमावाचा बेदम चोप:अबनॉर्मल तरुणासोबत प्रकार; गैरसमजातून झाल्याने दोन्ही पक्षांचा तक्रारीस नकार