![]()
संपूर्ण महाराष्ट्रात कर्तव्य बजावत असताना ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर हल्ल्यांच्या घटना वाढत असल्याने अधिकाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. अधिकाऱ्यांना सुरक्षित वातावरणात काम करता यावे, यासाठी शासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, या
.
यावेळी जिल्हाध्यक्ष युवराज पाटील, किशोर जेजुरकर, ज्ञानेश्वर सुर्वे, सुनील राजपूत, अशोक नरसाळे, पोपट रासकर यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शिवरे दिगर ग्रामपंचायतीत कर्तव्य बजावत असताना ग्रामपंचायत अधिकारी कै. पी. एन. पाटील यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर मानसिक त्रासामुळे त्यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे ग्रामपंचायत अधिकारी संवर्गात संताप व भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. पाटील यांच्या मृत्यूस कारणीभूत व्यक्तींवर खुनाचा गुन्हा दाखल करून तातडीने अटक करावी व खटला जलदगती न्यायालयात चालवावा, अशी मागणी करण्यात आली. अहिल्यानगर जिल्ह्यात १८ ऑगस्टपासून ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी ग्रामसभा कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. ग्रामसभांसाठी विनामूल्य व सक्तीचा पोलिस बंदोबस्त द्यावा, वर्षातील १० ते १२ ग्रामसभांऐवजी वर्षातून एकच ग्रामसभा घेण्याबाबत कायद्यात सुधारणा करावी, अशी मागणी करण्यात आली.
या आहेत प्रमुख मागण्या { ‘एक ग्रामपंचायत, एक ग्रामपंचायत अधिकारी’ पदनिर्मिती करावी. { रिक्त पदे तातडीने भरून ग्रामपंचायत सजेची पुनर्रचना करावी. ग्रामसभांची संख्या कमी करून वर्षातून एकच ग्रामसभा घ्यावी. ग्रामसभेतील अनधिकृत व्हिडिओ चित्रीकरणास प्रतिबंध करावा. { खोटी व बदनामीकारक माहिती प्रसारित करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी. { पी. एन. पाटील यांच्या मृत्यूस कारणीभूत व्यक्तींवर कठोर कारवाई करून खटला जलदगती न्यायालयात चालवावा.