Headlines

पुण्यात बेकायदा पिस्तुलातून सुटली गोळी सुटल्याने सराईत गुन्हेगार रुग्णालयात:एकाला अटक तर साथीदारावर गुन्हा दाखल




पुण्यातील धनकवडी परिसरात बेकायदा पिस्तुलातून चुकून गोळी सुटल्याने एक तरुण जखमी झाला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एकाला अटक केली असून, त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संकेत गोरक्ष चोरघे (रा. कोलवडी, ता. वेल्हे, जि. पुणे) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. अविनाश मोरे (रा. धनकवडी) याला अटक करण्यात आली आहे, तर त्याचा साथीदार सनी उर्फ संदीप सुभाष दीपक (वय 30, रा. फाईव्ह स्टार सोसायटी, धनकवडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 सप्टेंबर रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. धनकवडीतील आंबेगाव पठार येथील साईसिद्धी चौकात चोरघे, मोरे आणि दीपक थांबले होते. दीपक याचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे. दीपकला माहिती होती की चोरघेकडे देशी बनावटीचे बेकायदा पिस्तूल आहे, पण त्याने याबाबत पोलिसांना कळवले नव्हते. दीपक पिस्तूल हाताळत असताना अचानक त्याचा चाप ओढला गेला आणि पिस्तुलातून गोळी सुटली. या गोळीबारात संकेत चोरघे जखमी झाला. जखमी संकेत चोरघे हा सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त मिलिंद मोहिते, सहायक आयुक्त राहुल आवारे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली.गोळीबारात जखमी झालेल्या चोरघेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक एस. पवार करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *